Shani Sade Sati 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व ग्रहांमध्ये कर्मफळदाता शनि (Shani Dev) हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. यासाठीच शनीला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. शनि सध्या मीन राशीत स्थित आहेत. तसेच, नवीन वर्षात शनीचं राशी परिवर्तन होणार नाहीये. तसेच, गुरु ग्रह देखील मीन राशीत विराजमान आहे.
ज्योतिष शास्त्रात, शनिची साडेसाती ही सर्वात कष्टकारी आणि प्रभावी मानली जाते. ज्या राशींवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव असतो. त्या राशींना आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यानुसार, शनिच्या संक्रमणाने नवीन वर्षात कोणकोणत्या राशींवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव असणार आहे? तसेच, यासाठी उपाय कोणते ते जाणून घेऊयात.
2026 मध्ये या राशींवर असणार शनिच्या साडेसातीचा प्रभाव
ज्योतिष शास्त्रानुसार, शनि सध्या मीन राशीत विराजमान आहे. तसेच, 2026 मध्ये देखील शनि याच राशीत विराजमान असणार आहे. अशातच शनिच्या संक्रमणाने मेष, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव असणार आहे. त्याचबरोबर सिंह आणि धनु राशींवर देखील ढैय्याचा प्रभाव दिसून येणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
सध्या मेष राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना आयुष्यात अनेक संकटांना सामोरं जावं लागेल. अनेक आव्हानं तुमच्यासमोर उभी असतील. त्यामुळे कोणता मार्ग निवडावा याबाबत तुम्ही संभ्रमात असाल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना देखील सावध राहण्याची गरज आहे. आयुष्यातील कोणत्याही टप्प्यात तुमच्यासमोर संकट येऊ शकतं. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तुम्ही तो नीट विचारपूर्वकच घ्यावा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
सध्या कुंभ राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु आहे. त्यामुळे तुलनेने या राशीवर साडेसातीचा प्रभाव फारसा दिसून येणार नाही. मात्र, तरीही तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहणं महत्त्वाचं आहे. कर्मफळदाता शनि तुम्हाला तुमच्या कामावरुन देखील पारखू शकतो.
शनि साडेसातीचा उपाय (Shani Sade Sati Upay 2025)
- शनिवारच्या दिवशी मोहरीचं तेल दान करा.
- हनुमान चालीसाचं पठण करा.
- काळे तीळ दान करा.
- शिव चालीसाचं पठण करा.
- शनि चालीसाचं पठण करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :