नवी दिल्ली: पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात होणाऱ्या अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात, यासाठी काल (बुधवारी, ता १९) केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी भेट घेत सविस्तर चर्चा केली. या परिसरातील होणारे अपघात थांबावेत, यासाठी नितीन गडकरींच्या मार्गदर्शनात याआधीही विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मात्र नव्याने होणारे अपघातही थांबवेत, याबाबत अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्यावर नितीन गडकरींनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत पावले उचलण्यासंदर्भात आश्वस्त केल्याचंही मोहोळ यांनी सांगितलं आहे.(Muralidhar Mohol)
मागील गुरुवारी नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघातानंतर महामार्ग प्राधिकरण, महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. त्यात विविध उपाययोजना निश्चित करण्यात आल्या होत्या, याबाबत नितीन गडकरीशी संवाद साधला असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
Navale bridge: नवले ब्रीज परिसरातील भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू
मागील गुरुवारी सायंकाळी पुण्यात झालेल्या भीषण अपघाताने (Horrific Accident) राज्यभरात खळबळ उडाली. मुंबई–बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगद्याजवळ कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने सलग वाहनांना जोरदार धडक (Horrific Accident) दिली. या धडकेत आठ ते दहा वाहने चिरडली गेली, तर एका कारचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन त्याला आग लागली. या दुर्घटनेत कारमधील प्रवाशांसह एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला.पोलिसांच्या माहितीनुसार, अपघात (Horrific Accident) सायंकाळी साधारण ५.४५ वाजता झाला. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर स्वामीनारायण मंदिराजवळील तीव्र उतारावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रक पुढे जाताना मार्गातील अनेक वाहनांवर धडक देत सरकत राहिला. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यात संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट दिसतो आहे. (Horrific Accident)
या अपघातात एका कारला ट्रकने जोरदार धडक दिली. ती कार ट्रकच्या समोरच्या भागात अडकली आणि सोबत फरफटत पुढे गेली. पुढे जाऊन याच ट्रकने दुसऱ्या एका ट्रकला धडक दिली. दोन ट्रकच्यामध्ये अडकलेल्या कारने क्षणार्धात पेट घेतला आणि आगीचा मोठा भडका उडाला. तीनही जळत असलेली वाहने काही अंतर पुढे जाऊन थांबली. अपघातातील दोन्ही ट्रक राजस्थान पासिंगचे असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पुण्यातील या भीषण अपघातात कारमधील पाच प्रवाशांसह कंटेनर चालक आणि सोबत असलेल्या क्लिनरचा देखील मृत्यू झाला. एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन महिला, एक लहान बाळाचा आणि चार पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय 20 ते 22 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. वाहने एकमेकांमध्ये इतकी अडकली होती की, त्यांना बाजूला करण्यासाठी कटर आणि क्रेनचा वापर करावा लागला.