Budhaditya Rajyog in November 2023 : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह, राशी, योग आणि राजयोग यांना खूप महत्त्व दिलं जातं. प्रत्येक ग्रह ठराविक काळाच्या अंतराने आपली राशी (Zodiac Signs) बदलतो आणि जेव्हा जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात तेव्हा राजयोग तयार होतो. त्याचा राशींवर थेट परिणाम होतो.


नुकताच ऑक्टोबरमध्ये बुध आणि सूर्याच्या संयोगाने बुधादित्य राजयोग तयार झाला होता आणि आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा वृश्चिक राशीत बुध आणि सूर्य एकत्र येणार असल्याने बुधादित्य राजयोग (Budhaditya Rajyog) तयार होत आहे. विशेष म्हणजे वृश्चिक राशीवर मंगळाचं अधिपत्य आहे, त्यामुळे या राजयोगाची घडण महत्त्वाची मानली जाते.


येत्या 17 नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि बुधादित्य राजयोग तयार होईल. सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे तयार होणारा योग खूपच खास असेल. अनेक राशींसाठी तो फायदेशीर ठरणार आहे. 


सिंह रास


बुध आणि सूर्याचं संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल, कारण सूर्य देव तुमच्या राशीचा स्वामी आहे. राजयोगाद्वारे, तु्म्ही नवीन वाहन आणि घर खरेदी करू शकता. तुम्हाला भौतिक सुख मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे आणि व्यावसायिकांनाही चांगल्या संधी मिळतील. समाजात मान-सन्मान मिळण्याची आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट व्यवसायाशी आणि प्रॉपर्टीशी संबंधित लोकांना चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. व्यवसायात प्रगती होऊ शकते.


तूळ रास


वृश्चिक राशीत ग्रहांचा राजा सूर्य देव आणि राजकुमार बुध यांच्या युतीने तयार होत असलेल्या राजयोगाचा तूळ राशीला देखील फायदा होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात आणि अडकलेला पैसाही परत येऊ शकतो. नोकरदार लोकांसाठी काळ अनुकूल राहील. पदोन्नती, नवीन नोकरीच्या ऑफर आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते. करिअर आणि व्यावसायिकांसाठीही नवीन मार्ग खुले होतील. मार्केटिंग, मीडिया, शिक्षण आणि कम्युनिकेशन या क्षेत्रांशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगला आणि फायदेशीर सिद्ध होऊ शकतो.


मकर रास


बुधादित्य राजयोग मकर राशीच्या लोकांना एखाद्या वरदानासारखा ठरेल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि नशीब तुमच्या बाजूने राहील. समाजात मान-सन्मान वाढेल, उत्पन्नात वाढ होईल. विवाहित लोकांच्या जीवनात प्रेम वाढेल, नातं पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुमच्या कामात यश मिळेल. उत्पन्नात वाढ आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामं पूर्ण होतील आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतील. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. शेअर बाजार, बेटिंग आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.


वृश्चिक रास


राजयोगामुळे वृश्चिक राशीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी हा काळ अनुकूल राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अनेक बदल पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप छान असणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. मंगळ वृश्चिक राशीचा अधिपती ग्रह असल्याने त्रिग्रही योगही तयार होईल, जो अतिशय शुभ आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील आणि व्यवसायातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Horoscope 2024: नववर्ष 2024 मध्ये उजळणार 'या' 4 राशींचं भाग्य; संपत्तीत होणार वाढ, गुरू-शनिची होणार कृपा