Horoscope 2024: नवीन वर्ष 2024 (New Year 2024) सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्षात प्रत्येक ग्रहाची स्थिती बदलत असते. शनिदेव (Shani) फक्त कुंभ राशीतच राहणार आहेत. यासोबतच मे महिन्यात गुरु ग्रह (Mercury) वृषभ राशीत प्रवेश करेल. यासोबतच राहू मीन आणि केतू कन्या राशीत राहतील. या बदलांमुळे अनेक राशींच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. 2024 हे वर्ष कोणत्या राशींसाठी भाग्यशाली असेल ते जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


गुरू मे महिन्यापर्यंत मेष राशीत राहील, यानंतर तो वृषभ राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मे महिन्यापर्यंत मेष राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष खूप खास असू शकतं. समाजात त्यांचा मान-सन्मान वाढेल, संपत्ती वाढेल. संपत्ती वाढल्याने रखडलेली कामं पुन्हा सुरू होतील. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकतं. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होऊ शकतात, याद्वारे तुम्ही नवीन संधींचा लाभ घेऊ शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी 2024 हे वर्ष खूप भाग्यवान ठरू शकतं.


कर्क रास (Cancer)


वर्षाच्या सुरुवातीला गुरु कर्क राशीच्या दशम भावात असेल, त्यामुळे नववर्षात कर्क राशीच्या लोकांच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होईल. अध्यात्माकडे कल वाढेल. यासोबतच या राशीच्या पाचव्या भावात शुक्र आणि बुधही असतील, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात. यासोबतच शनिच्या कृपेने मेहनतीचं फळ नक्की मिळेल. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूश राहतील, त्यामुळे तुम्हाला पदोन्नतीसह काही मोठी जबाबदारी मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.


वृश्चिक रास (Scorpio)


वर्षाच्या सुरुवातीला सूर्य देवासोबत मंगळ तुमच्या दुसऱ्या घरात असेल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. यासोबतच शुक्र आणि बुध देखील तुमच्या जीवनात आनंद आणू शकतात. करिअरबद्दल बोलायचं झालं तर, या वर्षी तुम्हाला घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नोकरीत तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. यासोबतच पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत लोकांना मोठं यश मिळेल. राहू पाचव्या घरात राहिल्याने तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल.


कुंभ रास (Aquarius)


या राशीमध्ये गुरू तिसऱ्या स्थानी असेल, यासोबतच शनिदेव वर्षभर तुमच्या राशीत राहणार आहे. यामुळे तुमच्या प्रत्येक कामादरम्यान तुमच्यावर शनिची कृपा असेल आणि त्यामुळे तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या व्यवसायात वाढ होईल आणि तुम्हाला चांगला नफा मिळेल. नशिबाने साथ दिल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल. विद्यार्थ्यांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. गुरुच्या कृपेने समाजात मान-सन्मानही मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Asta 2024: नवीन वर्ष 2024 ची सुरुवात 'या' राशींच्या लोकांसाठी ठरणार घातक; शनि अस्तामुळे उद्भवणार आर्थिक समस्या