Budh Transit 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 हे वर्ष अनेकांसाठी खास ठरणार आहे. अनेक ग्रहांच्या मोठ्या हालचाली, नक्षत्र परिवर्तन यासारख्या गोष्टींमुळे अनेक लोकांच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे, त्यामुळे अनेक लोकांच्या जीवनात संपत्ती, आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. ज्योतिषींच्या मते, 24 फेब्रुवारीपासून काही राशींचं नशीब चमकणार आहे. ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय?
कुंभ राशीत बुधाचा उदय, नशीबाचे दार उघडणार?
ज्योतिषशास्त्राबाबत बोलायचं झालं तर कोणताही ग्रह कोणत्याही राशी किंवा नक्षत्रामध्ये विशिष्ट काळासाठी राहतो. याशिवाय, वेळोवेळी अस्त होणे आणि उदय होणे हे देखील घडते. अशा परिस्थितीत 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पडतो. ग्रहांचे राजकुमार त्यांच्या निर्धारित अवस्थेतून वर येणार आहेत, ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम होऊ शकतात. सोमवार, 24 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत बुधाचा उदय होणार आहे. 12 पैकी 3 राशींचे भाग्य उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत?
वृषभ- चांगले दिवस सुरू होणार
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. कोणताही नवीन प्रकल्प सुरू केला जाऊ शकतो, जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल. घरी नातेवाईकांचे आगमन होऊ शकते. विचार न करता केलेल्या कृतीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदारासोबत गोडवा वाढेल. संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील.
मिथुन - धनात वाढ होण्याची शक्यता
ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाच्या उदयामुळे धनात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होईल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. जोडीदाराशी संबंध सुधारू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात रुची वाढू शकते. ज्येष्ठांसाठी दिवस चांगला जाईल. आरोग्याशी संबंधित लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. आर्थिक स्थितीत
वृश्चिक - आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय लाभदायक ठरेल. जीवनात सकारात्मक प्रभाव पडेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. नवीन काम कराल आणि त्यात विशेष रस घ्याल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा>>>
Numerology: आयुष्यातील खरं प्रेम म्हणता येईल, 'या' जन्मतारखेचे लोक नोकरीत उच्च पदावर पोहोचतात, अंकशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )