Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह (Mercury) आज म्हणजेच 24 जानेवारी रोजी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी राशी परिवर्तन करणार आहे. बुध ग्रह शनीच्या (Shani Dev) मकर राशीत असणार आहे. बुध आणि शनी ग्रह हे एकमेकांचे मित्र ग्रह आहेत.
आज संध्याकाळी 05 वाजून 45 मिनिटांनी बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रह मकर राशीत 18 दिवसांपर्यंत असणार आहे. त्यानंतर, शनीच्या कुंभ राशीत पुन्हा प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाचं हे संक्रमण अनेक राशींसाठी शुभकारक ठरणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
बुध ग्रहाचं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुम्हाला नोकरीत चांगलं यश मिळेल. त्यामुळे या राशीसाठी 18 दिवस खास असणार आहेत. या काळात तुम्हाला अनेक स्त्रोतांमधून लाभ मिळेल. तसेच, नवीन लोकांशी भेटीगाठी होतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं संक्रमण लाभदायक असणार आहे. त्यामुळे तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करु शकता. तसेच, तुमच्या हाती नवीन स्त्रोत लागतील. यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. परदेशात जाण्याची चांगली संधी मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तसेच, या काळात प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येईल. आरोग्याची देखील काळजी करण्याची गरज नाही.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं संक्रमण फार शुभकारक असणार आहे. तुम्हाला कुटुंबियांची चांगली साथ मिळेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तुमच्या कुटुंबात चांगलं वातावरण पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांचं देखील करिअर अगदी सुरळती चालेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: