एक्स्प्लोर

Budh Asta 2024 : फेब्रुवारीपासूनचा एक महिना समस्यांचा; बुध अस्तामुळे 'या' राशीच्या लोकांना सोसावं लागणार नुकसान

Budh Asta 2024 February : ज्योतिषशास्त्रात बुधला ग्रहांचा राजकुमार म्हटलं गेलं आहे. बुध संपत्ती, व्यवसाय, वाणी, बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्यांचा कारक आहे. बुध 8 फेब्रुवारी 2024 रोजी अस्त होत आहे आणि या दरम्यान तो 3 राशींच्या लोकांना जास्त हानी पोहचवू शकतो.

Budh Asta 2024 :  ज्योतिषशास्त्रात (Astrology) बुध ग्रहाला राजकुमार मानले जाते. बुध हा ज्ञान, विचार करण्याची क्षमता, उत्तम तर्क करण्याची क्षमता आणि उत्तम संवाद कौशल्याचा कारक आहे. बुधाचं मार्गक्रमण सर्व लोकांच्या आर्थिक जीवनावर, करिअर, वाणी, बुद्धिमत्ता आणि संवादावर परिणाम करेल. 8 फेब्रुवारीला बुध मकर राशीत अस्त होणार आहे. कोणत्याही ग्रहाचा अस्त चांगला मानला जात नाही, कारण अस्तामुळे ग्रहाची शक्ती कमकुवत होते.

ग्रहाचा अस्त होत असताना काही राशींच्या जीवनावर याचा शुभ, तर काही राशींच्या जीवनावर अशुभ प्रभाव पडतो. 8 फेब्रुवारीला बुधाचा अस्त होईल आणि 11 मार्चला बुधाचा उदय होईल. त्यामुळे, बुध मकर राशीत सुमारे 1 महिना अस्त स्थितीत राहील. अशा वेळी, बुध 3 राशींच्या जीवनावर अशुभ परिणाम टाकेल, त्यामुळे या राशीच्या लोकांनी या काळात थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. 

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी बुधाची ही स्थिती चांगली नाही, त्यामुळे या काळात मेष राशीच्या लोकांना नशिबाची साथ क्वचितच मिळेल. तुम्हाला काम पूर्ण होण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागेल. कामाच्या ठिकाणी थोडं सावध राहण्याची गरज आहे. तसेच नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. एकाग्रतेचा अभाव आणि बोलण्यात कटुता यामुळे नुकसान होऊ शकतं. तसेच तुमचं लग्न एखाद्या वयस्कर व्यक्तीशी होऊ शकतं. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रवासातही नुकसान होऊ शकतं. व्यवसायात तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात.

मिथुन रास (Gemini)

बुधाचा अस्त झाल्याने मिथुन राशीच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या लोकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. कौटुंबिक किंवा आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधगिरीने काम करावं, नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला व्यवसायात स्पर्धेला सामोरं जावं लागू शकतं. नोकरदार लोकांनाही फसल्यासारखं वाटू शकतं. या काळात कामाचा ताण राहील, सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. 

सिंह रास (Leo)

बुध अस्त स्थितीत गेल्याने सिंह राशीच्या लोकांचं नुकसान होऊ शकतं. या काळात तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक किंवा व्यवहार विचारपूर्वक करा. नोकरीमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात, परंतु त्या विचारपूर्वक स्वीकारा. कामाच्या ठिकाणी थोडं सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्याला मिळू शकतं. घरामध्ये भांडणं आणि तणाव वाढू शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Astrology : कसा असतो फेब्रुवारीत जन्मलेल्या लोकांचा स्वभाव? करिअर, आर्थिक स्थिती, लव्ह लाईफबद्दल जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 October 2026: आज नवरात्रीचा सहावा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा सहावा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Lucky Zodiac Signs : उद्या 16 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा तुमची लकी रास
उद्या 16 ऑक्टोबरचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-संपत्तीत होणार भरभराट, वाचा तुमची लकी रास
Numerology : वर्कहोलिक आणि जिद्दी स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पण...'या' एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं घडतं...
वर्कहोलिक आणि जिद्दी स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पण...'या' एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं घडतं...
Shardiya Navratri 2026: पंचमी, अष्टमी कि नवमी..नवरात्रीत देवी, कुलदेवीची ओटी कधी भरावी? घरी कि मंदिरात भरावी? 'या' एका गोष्टीशिवाय ओटी अपूर्ण! धार्मिक मान्यता...
पंचमी, अष्टमी कि नवमी..नवरात्रीत देवी, कुलदेवीची ओटी कधी भरावी? घरी कि मंदिरात भरावी? 'या' एका गोष्टीशिवाय ओटी अपूर्ण! धार्मिक मान्यता...

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget