Budh and Guru Yuti 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, बुध आणि गुरु ग्रहाला फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार, शिक्षण, व्यवसाय, बौद्धिक क्षमतेचा कारक मानतात. तर, गुरु ग्रहाला मान-सन्मान, भाग्य, धर्माचा कारक ग्रह मानतात. त्यामुळे या राशींच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. गुरु ग्रह सध्या मिथुन राशीत विराजमान आहे. तर, जून महिन्यात बुध ग्रहाची युती होणार आहे. त्यामुळे अनेक राशींच्या लोकांना दुप्पट लाभ मिळण्याची शक्यता आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 6 जून रोजी सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी गुरु ग्रह बृहस्पती आधीपासूनच विराजमान आहे. या दोन्ही ग्रहांची युती 22 जून 2025 पर्यंत असणार आहे. त्यामुळे या राशींवर बुध आणि गुरु ग्रहाचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
या राशीच्या लोकांवर बुध-गुरु ग्रहाची कृपा असणार आहे. तसेच, दुसऱ्या भावात हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुमचा अनेक क्षेत्रात विकास झालेला दिसेल. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या वाणीत गंभीरता पाहायला मिळेल. तुमच्या कुटुंबात सुख-शांती नांदेल. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर विशेष आशीर्वाद असणार आहे. या काळात तुमचे तुमच्या नातेवाईकांबरोबर चांगले संबंध निर्माण झालेले पाहायला मिळतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी बुध-गुरु ग्रहाची युती फार अनुकूल असणार आहे. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात चांगला लाभ पाहायला मिळेल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही थोडं सतर्क राहण्याची गरज आहे. या राशीच्या सहाव्या चरणात हे संक्रमण होत आहे. त्यामुळे तुमच्या खर्चात वाढ देखील होऊ शकते. या काळात तुमचं काम प्रामाणिकपणे करा. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, व्यवसायात चांगली वाढ झालेली दिसेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी गुरु-बुध ग्रहाची युती फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या चौथ्या स्थानी ही युती होणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळेल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला एखादी शुभवार्ता देखील मिळू शकते. मित्रांबरोबर असलेले जुने वादविवाद संपतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)