Astrology Panchang Yog 28 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 28 मे 2025 चा दिवस म्हणजेच आजचा वार हा बुधवार आहे. आजचा दिवस हा गणरायाला समर्पित आहे. त्यामुळे आजचा दिवस कोणकोणत्या राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच, आज चंद्राने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. या ठिकाणी गुरु ग्रह विराजमान आहे. त्यामुळे आजच्या दिवशी गजकेसरी योग (Yog) नावाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या शुभ राशींच्या लोकांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. आज तुमच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतील. तसेच, आज तुमच्यातील मदतीची वृत्ती दिसून येईन. गरजूंना तुम्ही मदत कराल. तसेच, तुमच्या घरातील वातावरण चांगलं राहील. भावा-बहि‍णींबरोबर चांगले संबंध निर्माण होतील. नोकरदार वर्गातील लोकांवर कामाच्या काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्यासाठी तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. आज तुम्ही लाडक्या बाप्पााच्या आशीर्वादाने तुमच्या दिवसाची सुरुवात करु शकता. तसेच, कोणतंही नवीन काम हाती घेण्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. तुमच्या व्यवसायात देखील याचे तुम्हाला परिणाम पाहायला मिळतील. ज्यांची अनेक दिवसांपासून कामे रखडली आहेत त्यांची लवकरच पूर्ण होतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना आज भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तसेच, काही खाल लोकांशी भेटीगाठी होतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा चांगला  विकास होईल. कामकाजात तुमची चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं जास्त मन रमेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्हाला सकाळपासूनच शुभवार्ता मिळतील. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. तसेच, तुमची नियोजित कामे वेळेत पूर्ण करु शकाल. तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कुटुंबियांचा चांगला पाठिंबा तुम्हाला मिळेल. मित्रांचं सहकार्य देखील तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. तसेच, तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. नवीन नाती निर्माण होतील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. त्यासाठी तुम्ही लवकरच धार्मिक स्थळाला भेट द्याल. 

हे ही वाचा : 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 28 May 2025 : आज बुधवारच्या दिवशी गणरायाचा 'या' 5 राशींवर असणार आशीर्वाद; नवीन नोकरी मिळण्याची संधी? आजचे राशीभविष्य