Buddha Purnima 2024 : बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे महान आध्यात्मिक गुरुंपैकी एक होते. बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला. म्हणूनच याला बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) असेही म्हणतात. बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात मोठा सण आहे. या तिथीला बौद्ध धर्माव्यतिरिक्त हिंदू धर्मातही खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मानुसार मानले जाते की, भगवान बुद्ध हा भगवान विष्णूचा शेवटचा आणि 9वा अवतार होता. 


गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला. यावेळी ही तारीख गुरुवार, 23 मे 2024 रोजी आहे. यावेळी गौतम बुद्धांची 2586 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. जगभरात बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. चीन, जपान, श्रीलंका, दक्षिण कोरिया, बर्मा, थायलंड ही बौद्ध राष्ट्रे आहेत. भगवान बुद्धांच्या उपासनेची शुभ वेळ आणि पद्धत नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात


बुद्ध पौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त (Buddha Purnima Puja Shubh Muhurta 2024).


विजय मुहूर्त : दुपारी 02:35 ते 03:30 पर्यंत.


संधिप्रकाश मुहूर्त : सायंकाळी 07:08 ते 07:29 पर्यंत


सर्वार्थ सिद्धी योग : दुसऱ्या दिवशी सकाळी 09:15 ते 05:26 पर्यंत.


बुद्ध पौर्णिमा पूजेची पद्धत (Buddha Purnima Puja 2024)



  • बुद्ध जयंती किंवा वैशाख पौर्णिमेला सकाळी नदी स्नान करावे. 

  • नदीत स्नान केल्यानंतर हातात तीळ ठेऊन पितरांना संतुष्ट करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या.

  • नदीत स्नान करणे शक्य नसल्यास बादलीभर पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे.

  • नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत पाळण्याची प्रतिज्ञा घ्या.

  • आता विधीनुसार भगवान विष्णूची पूजा करा. 

  • भगवान विष्णूसमोर तूप, तीळ आणि साखरेने भरलेले भांडे ठेवा.

  • दिवा लावताना त्यात तिळाचे तेल टाकून दिवा लावावा.

  • आरती करावी.

  • या दिवशी बोधीवृक्षाच्या फांद्यामध्ये दूध आणि सुगंधित पाणी टाकून दिवा लावावा. 

  • पिंजऱ्यात बंद पक्ष्यांना मुक्त करा आणि त्यांना आकाशात सोडा.

  • बौद्ध स्थळांना भेट द्या आणि प्रार्थना करा. 

  • बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध धर्मग्रंथांचे पठण करा. 

  • आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान वाटप करा. 

  • रात्री चंद्राची पूजा फुल, उदबत्ती, दिवा, खीर इत्यादींनी करावी.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Shy People Effect : अत्यंत हुशार, स्वभावाने शांत आणि चांगले श्रोते असतात 'या' राशींचे लोक; फक्त इतरांसमोर आपलं म्हणणं यांना करता येत नाही व्यक्त