मुंबई : भाजपाला (BJP)  एकवेळ राष्ट्रीय स्वंयसेवक( RSS) ची गरज होती. पण पक्षाने आज आपला विस्तार केलाय. भाजपा आज स्वत:चा कारभार करण्यासाठी सक्षम आहे, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda)  यांनी केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. संघ या विचारानं स्ट्राँग  असणाऱ्या संस्थेबाबत भाजपचे वरिष्ठ नेते जर गरज संपली असं म्हणत असतील तर भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांना देखील धोक्याची घंटा आहे, असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.  एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवार बोलत होते.


शरद पवार म्हणाले, संघ या विचारानं स्ट्राँग असणाऱ्या संस्थेबाबत भाजपचे वरिष्ठ नेते जर गरज संपली असं म्हणत असतील तर भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांना देखील धोक्याची घंटा आहे. ज्या दिवशी भाजपला त्यांची गरज संपेल त्या दिवशी सांगा बाबत त्यांनी जो अप्रोच घेतला तसाच अप्रोच राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


पंतप्रधान प्रचंड घाबरलेले : शरद पवार


शरद पवार म्हणाले, पंतप्रधान प्रचंड घाबरलेले आहेत. त्यामुळे सभा मोठ्या प्रमाणात त्यांनी घेतल्या. महत्त्वाची बाब म्हणजे सभा घेऊन ते सांगत काय आहेत तर व्यक्तिगत हल्ले करतात. देशासमोरचे महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून व्यक्तिगत हल्ले करणे हे योग्य नाही. मला ते भटकती आत्मा म्हणाले. मुळात त्यांनी राज्यातले महत्त्वाचे प्रश्न यावर लक्ष द्यायला पाहिजे परंतु त्यांनी लोकांची निराशा करण्याचं काम केलं. मला भटकती आत्मा म्हणणं राहुल गांधींना शहाजहा म्हणणं हे काही निवडणुकीचे  प्रश्न नाहीत. 


भाजपसोबत जाण्यावर शरद पवार म्हणाले...  


भाजपसोबत जायचे असे आमच्या सर्व सहकाऱ्यांचे म्हणणं होतं.. आपण सत्तेत गेलं पाहिजे. त्यांनीही माझ्यापासून लपवून ठेवली नव्हती. मी एक दिवस त्यांना त्यांचा प्रस्ताव मागितला. प्रस्ताव समजून घेताना चर्चा झाली. प्रत्येकाने भूमिका मांडली मात्र भाजप सोबत जाण्याचे भूमिका मी स्वीकारली नाही. म्हणून मी शेवटी त्यांना सांगितलं तुम्ही भाजप सोबत जाणार असेल तर जा मी येऊ शकत नाही.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणावर शरद पवार म्हणाले....


इंडिया आघाडीची संख्या 28 पक्षांची आहे. पंधरा पक्ष असे आहेत ज्यांचे लोकसभेत एक सदस्य आहेत. जिथं विचारधारा एक आहे तिथं वेगळा निर्णय कशाला घ्यायचा. म्हणून काँग्रेसमध्ये विलीनीकरण संदर्भातला चर्चा झाली. याचा अर्थ असा नाही की लगेच जाऊन पक्षविलिन करा. वेळ आल्यावर यावर विचार करता येईल का? याबाबत मी मत मांडलं होतं, असेही शरद पवार म्हणाले.  


अजित पवारांच्या संधी न मिळण्याच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले....  


सर्वांना माहिती आहे सुप्रिया सुळे यांना पक्षात काही संधी मिळाली आणि अन्य सहकाऱ्यांना पक्षात काय संधी मिळाली. त्यामुळे अजित पवार जे बोलता येत आता कौटुंबिक प्रश्न आहे त्याबाबत अधिक चर्चा न केलेली बरी...   


मतांचा टक्का यंदा कमी : शरद पवार


पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे चार खासदार आणि काँग्रेसचा एक खासदार आणि एमआयएमचा एक खासदार होता. यावेळी मात्र चित्र वेगळे असणार आहे. प्रत्येकांना यावर्षी उत्तम जागा मिळतील निवडणुकीदरम्यान लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या त्यावर आम्हाला हे स्पष्ट झाला आहे  मागच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबत मुस्लिम संघटन होते. यावर्षी हे मुस्लिम संघटन त्यांच्यासोबत नाही त्यामुळे यावेळी त्यांची ताकद कमी झाली आहे. त्यांच्या मतांचा टक्का यंदा कमी झालेला पाहायला मिळेल.  


हे ही वाचा : 


भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो : जेपी नड्डा