Bhaubeej 2024 Wishes in Marathi : दरवर्षी भाऊबीज (Bhaubeej 2024) हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला साजरा केला जातो. दिवाळीच्या दोन दिवसांनंतर भाऊबीज येते. भाऊबीजेला बहिण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. त्या बदल्यात भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. भावा-बहिणींसाठी हा दिवस खास असतो, तुम्ही त्यांना काही विशेष शुभेच्छा संदेश (Bhaubeej Wishes In Marathi) पाठवून सणाचा गोडवा वाढवू शकता.
भाऊबीज शुभेच्छा संदेश (Bhaubeej Wishes In Marathi)
सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहिणीच्या पवित्र नात्याचा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
काही नाती खूप अनमोल असतात.
त्यापैकी एक नातं म्हणजे तु आणि मी.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया
रे वेड्या बहीणीची वेडी ही माया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
क्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
लाख -लाख शुभेच्छा तुला,
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊ दे
बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे.
भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!
चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,
भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊबहिणीचे नाते आहे खूपच प्रेमळ
या नात्याला न लागो कोणाचीही नजर
दिवसेंदिवस वाढो तुमच्यातील नात्यातील माया-आदर
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊराया तुझ्या-माझ्या नात्याचे प्रेमाचे बंधन
माया आणि विश्वासाचे बंधन
तुझ्या माथी लावते चंदनाचा टिळा
दादा तुझ्या दीर्घायुष्यासाठीदेवाकडे प्रत्येक क्षणी करते प्रार्थना
भाऊबीजेच्या सणाचा उत्साह
असाच कायम राहावा
प्रत्येक बहिणीच्या पाठीशी
एकतरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
आठवण येते बालपणीची,
तुझी गोड हाक तुझी सदैव असणारी सोबत,
तुझा आशिर्वाद सदैव साथ आहे,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊबीजेचा आला सण,
बहिणीची प्रार्थना भावाचं प्रेम,
बहीण-भावाचं नातं असंच राहो,
भाऊबीजेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
नशीबवान असते ती बहीण,
जिच्या डोक्यावर असतो भावाचा हात,
प्रत्येक संकटात असते त्याची साथ,
भाऊबीजेच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
तांदूळाचा सुवास आणि केशराचा रंग,
कपाळावर लागला टिळा
आणि आली आनंदाची लाट,
बहिणीची साथ आणि भरपूर प्रेम,
तुम्हा सगळ्यांना भाऊबीज शुभेच्छा!
उटण्याच्या सुगंधाने तुझं घर दरवळू दे,
तुझा माझ्या प्रेमाचा सुगंध जगभर पसरू दे,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा:
Bhaubeej 2024 : भाऊबीजेचा शुभ मुहूर्त कोणता? वाचा लाडक्या भाऊरायाला ओवाळण्याची शुभ वेळ