एक्स्प्लोर

Bhagavad Gita : अभ्यासक्रमात भगवद्गीता आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याची चर्चा, SCERT ची नेमकी शिफारस काय?

Bhagavad Gita : शालेय अभ्यासक्रमात लवकरच भगवद्गीतेचा समावेश करण्याचा विचार एससीईआरटी (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) करत असल्याची चर्चा आहे. या मुद्द्यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Bhagavad Gita In School : इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीता, (Bhagavad Gita), मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याबाबतच्या चर्चा शैक्षणिक वर्तुळात होत आहेत.  एससीईआरटीने (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) सूचवलेल्या अभ्यासक्रमावर सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.  मुलांना आपल्या देशातील परंपरांची ओळख करुन देणं आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणं हा त्यामागील उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने  राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. 

स्वभाववृत्ती आणि मुल्ये या घटकांची ओळख करुन देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा विचार देखील एससीईआरटी करत असल्याची चर्चा आहे, हा निर्णय पुढे वादग्रस्त देखील ठरू शकतो.  

तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम कसा असणार?

भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा, असं SCERT ने सुचवलं आहे. तिसरी ते पाचवीपर्यंत 1 ते 25 मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्यायाच्या पाठांतरांची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय संस्कृतीच्या इतर बाबीही शिकवल्या जाणार

त्याचप्रमाणे भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी. भारतीय ऋषींची दीनचर्या कशी होती, त्यांचा आहार कसा होता, गुरुशिष्य परंपरा यांचीही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी, अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात आली आहे. विज्ञान, गणित या विषयांमध्येही भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्याचं आराखड्यात नमूद करण्यात आलं आहे.

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य

मराठी माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमांमध्येही मराठी भाषा शिकवणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, अभ्यासक्रम आराखड्यात अद्यापही त्याबाबत स्पष्ट तरतूद नाही. मराठी व्यतिरिक्त इतर भाषा माध्यमांच्या शाळांमधील भाषा निवडीचे पर्याय कसे असावेत, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.

महाराष्ट्र राज्यात इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, पंजाबी, सिंधी, तामिळ माध्यमांच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये स्थानिक भाषा मराठी असल्याने तीच प्राथमिक भाषा करायला हवी होती. परंतु, या बाबतीत अद्यापही कोणत्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नाही.

हेही वाचा:

Shani Dev : 135 दिवस शनि चालणार उलटी चाल; वृषभसह 'या' 4 राशींवर धनवर्षाव; अडकलेली कामंही मार्गी लागणार                    

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांच रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित...
भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांच रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित...
Numerology : पैशांनी नाही पण मनाने श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मदतीसाठी नेहमी असतात तत्पर, तुमची जन्मतारीख कोणती?
पैशांनी नाही पण मनाने श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मदतीसाठी नेहमी असतात तत्पर, तुमची जन्मतारीख कोणती?
Hindu Religion: कोण आहेत 'ते' 7 चिंरजीवी..जे कलियुगात आजही जिवंत? ते आज कुठे आहेत? भगवान कल्किचे सैन्य बनतील? धर्म, शास्त्रातील वर्णन जाणून थक्क व्हाल
कोण आहेत 'ते' 7 चिंरजीवी..जे कलियुगात आजही जिवंत? ते आज कुठे आहेत? भगवान कल्किचे सैन्य बनतील? धर्म, शास्त्रातील वर्णन जाणून थक्क व्हाल
Dwidwadash Drushti Yog 2026 : आज जुळून येणार दुर्लभ द्विद्वादश योग; 4 राशींच्या पदरात पडणार पुण्य, सुवर्णकाळाचा अवधी अवघ्या काही तासांतच सुरु...
आज जुळून येणार दुर्लभ द्विद्वादश योग; 4 राशींच्या पदरात पडणार पुण्य, सुवर्णकाळाचा अवधी अवघ्या काही तासांतच सुरु...

व्हिडीओ

Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Manoj Jarange Patil at Jantar Mantar: मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, मी हिंदीत बोललो तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, 'माझी हिंदी ऐकाल तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सडकून प्रहार
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सडकून प्रहार
Ajit Pawar and Sunetra Pawar: अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
अजित पवारांचं विमान जिथे कोसळलं, त्याचठिकाणी आज सुनेत्रा पवार पोहोचल्या अन् ती जागा एकटक पाहत बसल्या, VIDEO
Embed widget