Baby Born In Pitru Paksha 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, सनातन धर्मात पितृपक्षाला (Pitru Paksha 2025) फार महत्त्व देण्यात आलं आहे. मात्र, या काळात कोणतंच शुभ कार्य केलं जात नाही. साधारणपणे पंधरा दिवस पितृपक्षाचा काळ असतो.  या पंधरा दिवसांच्या कालावधीत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी लोक पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध करतात. त्यानुसार, आज पितृपक्षाचा आठवा दिवस सुरु आहे. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमा तिथीपासून अश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीपर्यंत पितृपक्षाचा काळ असतो. 

Continues below advertisement


पितृपक्षात जन्मलेली बाळं कशी असतात?


धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षात कोणतंही शुभ कार्य करणं वर्जित मानलं जातं. जसे की, लग्न समारंभ, मुंज, गृहप्रवेश यांसारखी शुभ कार्य केली जात नाही. अशातच, जर पितृपक्षाच्या तिथीला एखाद्या बाळाचा जन्म झाला तर पितृपक्षात जन्मलेली बाळं कशी असतात हा प्रश्न नक्कीच पडतो. 
त्यांना पूर्वजांचा खरंच आशीर्वाद मिळतो की आयुष्यभर त्यांना कष्ट सोसावं लागतं? या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात. 


पितृपक्षात जन्मलेली बाळं 


मान्यतेनुसार, पितृपक्षाच्या काळात जर घरात एखाद्या बाळाचा जन्म झाला तर तो शुभ संकेत मानला जातो. त्या बाळावर पितरांचा आशीर्वा असतो असं म्हणतात. मान्यतेनुसार, पितृपक्षात बाळ आपल्याच कुळातील पूर्वज म्हणून जन्माला येतात. त्यामुळे या बाळांचं भविष्य उज्ज्वल असतं. आणि हे मूल भविष्यात चांगलं नाव कमावतात. 


कसा असतो स्वभाव?


ज्या बाळाचा जन्म पितृपक्षात होतो ते फार मिश्कील स्वभावाचे असतात. त्यांचा स्वभाव फार रचनात्मक असतो. तसेच, ही मुलं आपल्या कुटुंबियांशी एकनिष्ठ असतात. यांचा फार सकारात्मक दृष्टीकोन असतो. तसेच, कोणताही निर्णय घेण्यासाठी हे सक्षम असतात. तसेच, आपल्या वयापेक्षा जास्त मोठी यांची विचारसरणी असते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :    


Pitru Paksha 2025 : पितृपक्षात 'ही' 3 झाडं लावाच, पितरांचा मिळेल भरभरुन आशीर्वाद; मनातील इच्छाही होतील पूर्ण