Pitru Paksha 2025 : दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीपासून पितृपक्षाची (Pitru Paksha 2025) सुरुवात होते. तर, अश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीला पितृपक्ष पंधरवडा संपतो. त्यानुसार, यंदा 7 सप्टेंबर 2025 रोजी पितृपक्षाची सुरुवात होणार आहे. हा पंधरवडा पुढच्या 21 सप्टेंबर 2025 पर्यंत असणार आहे. 

Continues below advertisement


पितृपक्षाचा काळ मुख्यता पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा असतो. मान्यतेनुसार, पितृपक्षात पिंडदान, तर्पण, पूजा, धूप दान तसेच दानधर्म करणं पुण्याचं मानलं जातं. असे केल्यास घरगुती वादविवादापासून मुक्ती मिळते. घरात शांतता टिकून राहते.या व्यतिरिक्त अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतात. घरात सुख-समृद्धी नांदते. 


त्याचप्रमाणे, पितृपक्षात काही झाडं-रोपटं लावणं फार शुभ मानलं जातं. यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. पण, पितृपक्षात कोणती झाडं लावणं शुभ आहे ते जाणून घेऊयात. 


पिंपळाचं झाड


धार्मिक मान्यतेनुसार, पिंपळाच्या झाडात पूर्वजांचा वास असतो. यासाठीच श्राद्धात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास पितर प्रसन्न होतात. या व्यतिरिक्त पितृपक्षाच्या दरम्यान तुम्ही पिंपळाचं झाड लावूदेखील शकता. यामुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी टिकून राहण्यास मदत होते. 


बरगद 


पितृपक्षात बरगदच्या झाडाची पूजा करणं फार शुभ मानलं जातं. मान्यतेनुसार, हे झाड दीर्घायुष्य, ब्रह्मा, विष्णू आणि शंकराच्या त्रिमूर्तीचे प्रतीक आहे. जर, शास्त्राप्रमाणे विधीवत याची पूजा आणि परिक्रमा केल्यास आयुष्यात सकारात्मकता येते. त्यामुळे हे झाड पितृपक्षात लावणं शुभ मानलं जातं. यामुळे घरातीलही अनेक दोष दूर होतात. 


तुळशीचं रोप 


तुळशीला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे. यामुळेच, प्रत्येक सण-समारंभाला तुळशीची पूजा केली जाते. यामुळे देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होतात. मान्यतेनुसार, पितृपक्षात तुळशीचं रोप लावल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि ग्रह दोषापासून मुक्ती मिळते. 


हेही वाचा :                                                                                 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Chandra Grahan 2025 : साडेसाती आणि ढैय्या राशींवर चंद्रग्रहणाचा परिणाम होणार? असल्यास, कोणती काळजी घ्याल? वाचा ज्योतिषशास्त्र