Continues below advertisement


Baba Vanga 2025 Prediction Lucky Zodiac Signs : बाबा वेंगाची (Baba Vanga) भविष्यवाणी (Predictions) नेहमीच चर्चेचा विषय असते. त्यांनी केलेल्या भविष्यवाणी केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच, त्यांनी अशा काही गोष्टींबाबत भाकित केलं आहे ज्या काळानुसार खऱ्या ठरल्या आहेत. त्यानुसार, बाबा वेंगा यांनी 2025 वर्षाबाबत देखील आश्चर्यकारक भविष्यवाणी केली आहे.


2025 वर्ष संपायला अवघे ती महिने शिल्लक आहेत. मात्र, बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, हा तीन महिन्यांचा काळ काही राशींसाठी फार शुभकारक असणार आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.


वृषभ रास (Taurus Horoscope)


बाबा वेंगानुसार, 2025 या वर्षाच्या शेवटचा तीन महिन्याचा काळ वृषभ राशीसाठी फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्यावर सूर्यदेवाची विशेष कृपा असणार आहे. तसेच, ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंचत तुमच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील ज्याचा तुम्हाला दिर्घकाळासाठी चांगला लाभ मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, या तीन महिन्यांच्या काळात तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात.


मिथुन रास (Gemini Horoscope)


बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी 2025 वर्षातील शेवटचे तीन महिने शुभ संकेत देणारे ठरतील. या काळात देवगुरु बृहस्पतीची तुमच्यावर कृपा असणार आहे. तसेच, नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. या काळात तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतील. तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. तसेच, तुमचं मन प्रसन्न राहील.


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी 2025 वर्षाचा शेवट सौभाग्यशाली असणार आहे. या काळात शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. करिअर आणि बिझनेसमध्ये तुमची दिवसेंदिवस प्रगती पाहायला मिळेल. तसेच, जर तुम्हाला या काळात नवीन वस्तूची खरेदी करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.


कुंभ रास (Aquarius Horoscope)


बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी 2025 वर्षाचा शेवट फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या मनात राहिलेल्या इच्छा तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबात सुख शांती टिकून राहील. नात्यात गोडवा निर्माण होईल. तसेच, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्यासाठी नक्कीच एक शुभवार्ता असणार आहे.


हेही वाचा :          


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Shani Pradosh Vrat 2025 : आज ऑक्टोबर महिन्याचं पहिलं प्रदोष व्रत! 'या' उपायांनी शनिदेवाची कृपा मिळवा! ढैय्या आणि साडेसातीतून मिळेल मुक्ती