Shani Pradosh Vrat 2025 : वैदिक शास्त्रानुसार, आज शनिवारचा दिवस आहे. तसेच, आजच्या दिवशी शनि प्रदोष व्रत (Shani Pradosh Vrat) जुळून आला आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याचं हे पहिलंच प्रदोष व्रत असणार आहे. शास्त्रानुसार, आजच्या दिवशी भगवान शंकराची (Lord Shiva) पूजा केली जाते. त्याचबरोबर, शनिदेवाचीही (Shani Dev) पूजा केली जाते. यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होतात. यंदाचा शनि प्रदोष व्रत खास असणार आहे. याचं कारण म्हणजे, हे प्रदोष व्रत शनिवारी असल्यामुळे ज्या ज्या राशींवर (Zodiac Signs) शनिची ढैय्या आणि साडेसाती सुरु आहे. त्यांना शनिच्या वाईट प्रभावापासून मुक्ती मिळेल.


शनि प्रदोष व्रताची तिथी (Shani Pradosh Vrat Tithi 2025)


हिंदू पंचांगानुसार, शनि त्रयोदशी तिथी 4 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजून 9 मिनिटांपासून सुरु होणार आहे. तर, 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 3 मिनिटांपर्यंत हे व्रत असणार आहे. तर, शनी प्रदोष काळ संध्याकाळी 6 वाजून 3 मिनिटांपासून ते रात्री 8.30 वाजेपर्यंत असणार आहे.


ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या राशीवर शनिची ढैय्या किंवा साडेसातीचा प्रभाव असतो. तर त्या व्यक्तीला अनेक कठीण परिस्थितीचा समाना करावा लागतो. अशा वेळी तुम्ही काही सोपे उपाय करु शकता.


भगवान शंकराची पूजा (Lord Shiva Puja)


प्रदोष काळात (सूर्यास्तानंतर) भगवान शंकराची विधीवत पूजा करा. यासाठी शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, मध अर्पण करा. तसेच, शिव चालीसाचे पठण करा. यामुळे शनि प्रदोषाचे प्रभाव कमी होतील.


देवी लक्ष्मीची पूजा करा (Goddess Lakshmi Puja)


देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी घरात दिवा प्रज्वलित करा. तसेच, लक्ष्मी अष्टक स्त्रोताचं पठण करा. लक्ष्मी मंत्राचा जप करा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल.


शनिदेवाच्या मंत्राचा जप करा (Lord Shani Mantra)


शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारच्या दिवशी शनिच्या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच, शनि स्त्रोताचं देखील पठण करा.


दान करा (Donate)


या दिवशी तुम्ही काळे तीळ आणि गूळ मिळवून मुंग्यांना खाऊ घाला. शनिदेवाला मोहरीचं तेल अर्पण करा. तसेच, काळे वस्त्र आणि भोजन गरजूंना दान करा. यामुळे शनिची साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव कमी होईल.


हेही वाचा :          


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Astrology : आज द्विपुष्कर योगासह ग्रहांचा शुभ संयोग; मेष, मिथुनसह 'या' 5 राशी ठरतील भाग्यशाली, भगवान शंकराची राहील कृपा