Auspicious Yog : ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस खास आहे. आजच्या दिवशी (27 डिसेंबर) धनु राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात त्रिग्रही योग अत्यंत शुभ मानला जातो. बुधवारी (27 डिसेंबर) मंगळ धनु राशीत प्रवेश करणार आहे. तर धनु राशीमध्ये सूर्य आणि बुध आधीच उपस्थित आहेत. अशा स्थितीत धनु राशीत मंगळाच्या प्रवेशामुळे या तीन ग्रहांची त्रिसूत्री तयार होईल, ज्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल. हा त्रिग्रही राजयोग सर्व 12 राशींवर परिणाम करेल, परंतु 5 राशींसाठी विशेषतः तो शुभ राहील. या लोकांना वर्ष 2024 च्या सुरुवातीपासून पैसे आणि करिअरच्या बाबतीत जबरदस्त फायदे मिळू शकतात. नेमक्या कोणत्या राशींच्या (Zodiac Signs) लोकांना त्रिग्रही योग लाभणार आहे, जाणून घेऊया.


तूळ रास (Libra)


सूर्य, बुध आणि मंगळाच्या संयोगाने तयार होणारा त्रिग्रही योग तूळ राशीच्या लोकांना लाभ देईल. या लोकांना करिअरच्या बाबतीत मोठे यश मिळू शकते. तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. फ्रीलान्सरना कायमस्वरूपी नोकरी मिळू शकते. आर्थिक लाभ होईल. उत्पन्न वाढेल. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना यश मिळू शकते. 


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग खूप फायदेशीर ठरेल. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे अनुकूल फळ मिळेल. पैशाशी संबंधित योजना यशस्वी होतील. तुम्हाला सर्वच बाबींमध्ये फायदा होईल. व्यावसायिक लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. तुम्ही सहलीला जाऊ शकता. 


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांना हा त्रिग्रही योग सुख-सुविधांनी परिपूर्ण जीवन देईल. तुमचे धैर्य, सामर्थ्य आणि आत्मविश्वास देखील वाढेल. वडिलधाऱ्यांचा पूर्ण आशीर्वाद मिळेल. व्यावसायिक जीवनात अपेक्षित यश मिळू शकते. लव्ह लाईफ चांगली राहील. 


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही हा योग लाभदायक ठरेल. अचानक कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात. जीवनमान सुधारण्यावर तुमचा भर असेल. वादांपासून दूर राहिल्यास हा काळ खूप फायदेशीर असेल. 


मीन रास (Pisces)


त्रिग्रही योग मीन राशीच्या लोकांना खूप चांगली संधी देईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगली कामगिरी कराल. तुमचा मान-सन्मान वाढेल. आर्थिक लाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन वर्षात तुमच्या करिअरला चांगली सुरुवात होईल. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांनाही फायदा होईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani 2024 : तीन महिन्यांनंतर शनिदेव नक्षत्र बदलणार; 'या' 4 राशींना होणार मोठा फायदा