Astrology: तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिणे शुभ का मानतात? 'या' ग्रहांची बक्कळ कृपा! ज्योतिषशास्त्रातील 'हा' उल्लेख जाणून व्हाल थक्क...
Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, तांबे एका विशिष्ट ग्रह आणि तत्त्वाशी संबंधित आहे. तांब्याचे पाणी पिण्याचे ज्योतिषशास्त्रीय फायदे जाणून घेऊया.

Astrology: आपण अनेकदा पाहतो, अनेकजण सकाळी उठल्याबरोबर तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. तांब्याच्या भांड्यात पाणी साठवून पिणे ही एक अतिशय प्राचीन परंपरा आहे. हिंदू धर्मात, याचा संबंध आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र या दोन्हींशी जोडला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, तांबे एका विशिष्ट ग्रह आणि तत्त्वाशी संबंधित आहे. तांब्याचे पाणी पिण्याचे ज्योतिषशास्त्रीय फायदे जाणून घेऊया..कोणते तत्त्व आणि ग्रह संबंधित आहे. जाणून घ्या...
तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे शुभ कि अशुभ?
तांब्याच्या भांड्यातून, ग्लासातून किंवा घागरीतून पाणी पिणे हा काही नवीन उपाय किंवा शास्त्र नाही. हजारो वर्षांपूर्वी, आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी केवळ आयुर्वेदिकच नव्हे, तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टीनेही याला एक प्रभावी आणि अचूक उपाय म्हणून घोषित केले होते. प्राचीन काळी, याला एक विधी मानले जात असे. आज, विज्ञानानेही याला मान दिला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया...
या 2 ग्रहांची कृपा...
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, तांबे थेट सूर्यदेव आणि मंगळ यांच्याशी जोडलेले आहे. तांबे हा सूर्याचा प्रमुख धातू मानला जातो. म्हणूनच तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण केल्याने सूर्याचा आशीर्वाद मिळतो आणि आत्मविश्वास, बुद्धिमत्ता व नेतृत्व क्षमता वाढते. तांब्याचा लाल किंवा तांबूस रंग मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. या धातूच्या वापरामुळे मंगळाचे नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि ऊर्जा, धैर्य व रक्ताभिसरण सुरळीत राहते.
अग्नी आणि जल तत्त्वाचा संयोग
ज्योतिषशास्त्रानुसार, तांबे प्रामुख्याने अग्नी तत्त्वाशी संबंधित आहे. सूर्य आणि मंगळ हे दोन्ही अग्नी तत्त्वाचे ग्रह आहेत. तथापि, तांब्याच्या भांड्यातील पाणी चंद्राशी संबंधित आहे. त्यामुळे, तांब्याच्या भांड्यात साठवलेल्या पाण्यात अग्नी आणि जल ही दोन्ही तत्त्वे असतात. म्हणूनच या तत्त्वांच्या सुसंवादामुळे मानसिक शांती आणि शारीरिक ऊर्जा दोन्ही मिळते.
ज्योतिषशास्त्रीय फायदे जाणून घ्या..
ज्योतिषशास्त्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील तीन दोषांचे (कफ, पित्त आणि वात) संतुलन राखले जाते, ज्यामुळे उत्तम आरोग्य टिकते. यामुळे विचारांमधील नकारात्मकता दूर होते, सकारात्मकता येते, मानसिक ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते.
या नियमांचे पालन करा, ज्योतिषशास्त्र सांगते...
ज्योतिष स्पष्ट करते: तांब्याच्या भांड्यातील पाण्याचा पूर्ण उपयोग तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा ते कमीतकमी आठ तास भांड्यात राहील. तरच पाण्यात तांब्याचा अंश शोषला जाऊ शकतो. तसेच, हे पाणी रिकाम्या पोटी पिणे उत्तम. दुसरे म्हणजे, तांब्याचे भांडे कधीही जमिनीवर ठेवू नये. ते नेहमी टेबल किंवा लाकडी फळीवर ठेवावे. तसेच, तांब्याच्या भांड्यात चुकूनही कोणतीही आंबट वस्तू पडणार नाही याची काळजी घ्या, कारण ती विषारी असू शकते.
हेही वाचा :
September Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! सप्टेंबरचे शेवटचे 15 दिवस नशीब पालटणारे, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















