Shani Dev : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) वय, दु:ख, रोग, संकट, विज्ञान, लोह, खनिज, तेल, कर्मचारी, सेवक या सर्वांचा कारक मानतात. यासाठीच जेव्हाही शनीच्या (Lord Shani) चालीत परिवर्तन होते तर या गोष्टींवर, क्षेत्रांवर सुद्धा त्याचा खूप वाईट परिणाम होतो. शनीने पूर्व भाद्रपदाच्या दुसऱ्या घरात प्रवेश केला आहे. ज्याचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर दिसणार आहे. पण, अशा काही तीन राशी आहेत ज्यांचं नशीब मात्र यावेळी चमकू शकते. तसेच, या लोकांना व्यवसायात आर्थिक लाभाबरोबरच नवीन नोकरीची संधीही मिळू शकते. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


मेष राशी (Aries Horoscope)


शनीचं नक्षत्र राशीतील बदल मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला अनपेक्षित धनलाभाची संधी मिळू शकते. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येऊ शकते. नोकरीच्या संदर्भातील तुमचे सगळे प्रश्न सुटतील. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात देखील वाढ होईल. जे व्यावसायिक आहेत त्यांनी यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशनची संधी आहे. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या नक्षत्रातील बदल फार चांगले ठरू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. तसेच, तुमची निर्णयक्षमता प्रगल्भ होईल. जे विवाहीत आहेत त्यांचे वैवाहिक जीवन छान राहील. तुमच्या जोडीदाराची प्रगती बघून तुम्हाला आनंद होईल. या दरम्यान तुमचा आदर आणि सन्मानही वाढेल. वडिलांबरोबर तुमचं नातं अधिक घट्ट राहील. तसेच, यावेळी तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. 


तूळ रास (Libra Horoscope)


शनीचा नक्षत्रात झालेला बदल तूळ राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. यावेळी तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. वडिलांशी संबंध दृढ होतील. तसेच, यावेळी तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या दरम्यान तुम्हाला अनपेक्षित धनलाभ मिळेल. या काळात व्यवसायात वाढ होण्याबरोबरच तुम्हाला मान-सन्मानही मिळेल, ज्यामुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील. तसेच, ज्यांना अपत्य प्राप्तीची अपेक्षा आहे त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य