Vastu Shashtra : पितृदोष ते कालसर्प दूर करतात कापूर, जाणून घ्या त्याचे उपाय
Vastu Shashtra : कापराचा वापर केल्याने ग्रह दोष, वास्तु दोष दूर होतात. जाणून घ्या कापराशी संबंधित काही उपाय ज्याचा वापर करून फायदे मिळू शकतात.
![Vastu Shashtra : पितृदोष ते कालसर्प दूर करतात कापूर, जाणून घ्या त्याचे उपाय astrology tips benefits of using camphor at home kapur upay marathi news Vastu Shashtra : पितृदोष ते कालसर्प दूर करतात कापूर, जाणून घ्या त्याचे उपाय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/16/2ac421ca588844c9f91b6047e6732b1a1663320035911381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vastu Shashtra : पुजेमध्ये कापराचे महत्वपूर्ण स्थान आहे. आरती करताना आणि हवनातही त्याचा वापर करा. त्याचे काही औषधी गुणधर्म आहेत, तसेच धार्मिक महत्त्वही आहे. कापूरशी संबंधित काही उपाय आहेत. जे केल्याने ग्रह दोष, वास्तु दोष दूर होतात. जाणून घ्या कापराशी संबंधित काही उपाय, ज्याचा वापर करून फायदे मिळू शकतात.
कापराचे उपाय
1. सकाळ-संध्याकाळ घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते, सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे कुटुंबात सुख-शांती नांदते.
2. जर तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात कापूरचे काही तुकडे घेऊन त्या ठिकाणी ठेवा. तो कापूर काही दिवसांनी संपला की तिथे कापूरचे नवे तुकडे टाकावेत. असे केल्याने वास्तुदोष हळूहळू दूर होतील.
3. तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की त्यांच्याकडे पितृदोष किंवा काल सर्प दोष आहे, त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. राहू आणि केतू या ग्रहांमुळे काल सर्प दोष होतो. या दोषांपासून मुक्त होण्यासाठी सकाळी, संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा.
4. शनिवारी आंघोळीच्या पाण्यात कापूर तेल आणि चमेलीचे तेल काही थेंब टाका, त्यानंतर आंघोळ करा. असे केल्याने शनिदोष दूर होईल. राहू-केतूलाही त्रास होणार नाही.
5. धार्मिक मान्यता अशी आहे की, वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये सामंजस्य चांगले चालत नाही, तर आपल्या बेडरूममध्ये कापूर ठेवा आणि काही दिवसांनी बदलत रहा. असे केल्याने पती-पत्नीचे नाते चांगले होऊ लागते.
6. जर तुम्हाला झोपताना भयानक स्वप्न पडत असतील किंवा झोपताना भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कापूर जाळला पाहिजे. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या
- Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत
- Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)