Astrology : ग्रहांच्या चालीनुसार आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. आजच्या दिवशी रवि योग (Yog), आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि शतभिषा नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 


वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालींचा 5 राशींवर (Zodiac Signs) परिणाम होणार आहे. या दरम्यान राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तसेच, समाजातही मान-सन्मान मिळणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. आज तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. तुम्हाला अचानक धनलाभ होईल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. तर, व्यावसायिकांना देखील व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे. तुम्ही धार्मिक कार्यात मन गुंतवू शकता. 


सिंह रास (Leo Horoscope)


आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस योगदानकारक ठरणार आहे. आज तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून जर कामे थांबली असतील तर ती तुम्ही आज पूर्ण करू शकता. भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या लाईफस्टाईलमध्ये अनेक चांगले बदल दिसून येतील. याचा तुमच्या करिअरवर देखील चांगला परिणाम होणार आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ तुम्हाला मिळेल. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक कार्यात यश मिळेल. समाजात तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, जर तुम्हाला नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक आहे. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात तुम्ही आजच्या दिवसापासून करू शकता. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. या दरम्यान तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीच्या सहयोगाने मौल्यवान वस्तू मिळू शकते. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. तुमचं मन धार्मिक कार्यात गुंतलेलं असेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 27 June 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य