Astrology Panchang Yog 9 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 9 ऑगस्ट 2025 चा दिवस आहे. आजचा दिवस हा शनिदेवाला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने मकर राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आज गुरु ग्रहाच्या साथीने केंद्र योगदेखील निर्माण झाला आहे. आजच्या दिवशी सौभाग्य योगासह समसप्तक योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीसाठी आजचा दिवस फार लकी असणार आहे. नोकरीत तुमची स्थिती चांगली पाहायला मिळेल. तसेच, फॅमिली बिझनेसशी संबंधित तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमच्या कामाची किर्ती दूरवर पसरेल. त्याचबरोबर. तुम्ही प्रॉपर्टीमध्ये देखील चांगली गुंतवणूक करु शकता. आज तुम्हाला धनलाभ होईल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज रक्षाबंधनाचा दिवस असल्या कारणाने तुम्हाला चांगला धनलाभ होईल. तसेच, ग्रहांची स्थिती शुभ असल्या कारणाने याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर देखील दिसून येईल. जोडीदाराचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तु्म्हाला चांगलं यश मिळेल. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. सकाळपासून तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेत पूर्ण होताना दिसतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा सपोर्ट मिळेल. कुटुंबातील वातावरण देखील आनंदी असेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्याला चांगलं यश मिळाल्यामुळे तुम्ही फार आनंदी असाल. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, महिलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. भौतिक सुख सुविधांचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, लवकरच देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. ग्रहांच्या स्थितीचा या राशीवर शुभ परिणाम पाहायला मिळेल. तसेच, आज भावा-बहिणीत चांगलं प्रेम दिसून येईल. कुटुंबातील वातावरण फार सकारात्मक असेल. तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला दिसेल. नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील. तसेच, धनलाभही होणार आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :    


Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक असतात 'ओव्हरथिंकर'; विचार करुन करुन डोक्याचा करतात भुगा, इतरांनाही यांचा मनस्ताप