Bollywood Actor Net Worth 1500 Crore: बॉलिवूडचे (Bollywood News) अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी आपल्या सुपरडुपर हिट फिल्मी (Superhit Film) करिअरच्या जोरावर कोट्यवधींचं साम्राज्य उभारलं. कधीकाळी आपला काळ गाजवणारे सेलिब्रिटी आज मात्र, फिल्मी करिअरपासून दूर आहेत. वाढत्या वयानुसार, त्यांनी स्वतःला रुपेरी पडद्यापासून दूर केलं आहे. पण, असं असलं तरीसुद्धा नेटवर्थच्या बाबतीत मात्र, आजी ते भल्याभल्या टॉप सेलिब्रिटींना मागे टाकतात. आज आम्ही ज्या अभिनेत्याबाबत सांगत आहोत, त्याचंही असंच काहीसं आहे. या अभिनेत्यानं आपला काळ गाजवला. पण, आता मात्र कित्येक वर्षापासून त्यानं स्वतःला रुपेरी पडद्यापासून दूर ठेवलं आहे. ना तो फिल्ममध्ये दिसला, ना तो टेलिव्हिजनवर दिसला... पण तरीसुद्धा त्यानं तब्बल 1500 कोटींचं साम्राज्य उभं केलं आहे. बरं एवढंच नाही बरं का, हा अभिनेता दर महिन्याला कोट्यवधींची कमाईसुद्धा करतो. आता काही न करता महिन्याला 3 कोटी रुपये कसे कमावतो असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल, जाणून घेऊयात सविस्तर...   

70-80 च्या काळात आपल्या अभिनयानं आणि अनोख्या डान्स स्टाईलनं लोकांना वेड लावणारा अभिनेता जितेंद्र... 83 वर्षांचे सुपरस्टार जितेंद्र (Jeetendra) आता चित्रपटांमध्ये सक्रिय नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून ना त्यांनी कोणतीही फिल्म केली, ना टीव्ही सीरिअल (TV Serial)... आश्चर्याची गोष्ट म्हणजे, असं असूनही त्यांच्या उत्पन्नात कोणतीही घट झालेली नाही.  

1500 कोटींच्या साम्राज्याचे मालक जितेंद्र 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जितेंद्र सुमारे 1500 कोटींच्या साम्राज्याचे मालक आहेत. पण, कसे... तर आता सुपरडुपर हिट सिनेमे करणारा अभिनेता त्यानं आजवर कमावलेल्या मालमत्तेतून पैसे कमावतो. त्यानं त्याच्या अनेक मालमत्ता भाडे तत्वावर दिलेल्या आहेत. दरमहा त्याला त्याचं लाखो रुपयांचं भाडं मिळतं. याशिवाय, अलिकडेच जितेंद्र यांनी त्यांची एक जमीन तब्बल 855 कोटी रुपयांना विकली आहे. ही जमीन विकून जितेंद्र रातोरात कोट्यधीश झालेले. 

कोट्यवधींच्या बंगल्यात राहतात जितेंद्र 

जितेंद्र प्रोडक्शन हाउस 'बालाजी टेलीफिल्म्स' आणि 'बालाजी मोशन पिक्चर्स'चे चेअरमन आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या प्रॉडक्शन हाऊसचं एकूण उत्पन्न 422 कोटी रुपये आहे. याशिवाय जितेंद् यांरचा जुहूमध्ये एक आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत 200 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेते जितेंद्र सुमारे 26 लाख रुपये कमवतात आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न सुमारे 3 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Jeetendra Became Owner Of RS 855 Crores: जितेंद्र यांनी 83 व्या वर्षी कमावले 855 कोटी! एका रात्रीत नशीब पालटलं, नेमकं काय केलं?