Astrology Panchang Yog 7 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 7 मे चा दिवस म्हणजेच आजचा वार बुधवार. आजचा दिवस हा गणरायाला समर्पित आहे. आजच्या दिवशी वैशाख शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. तसेच, आजच्या दिवशी गुरु ग्रह आणि चंद्र एकमेकांच्या चतुर्थ दहाव्या चरणात आहे. यामुळे गजकेसरी योग निर्माण झाला आहे. शुक्र उच्च राशीत असल्यामुळे मालव्य राजयोग देखील निर्माण झाला आहे. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीसाठी आजचा दिवस फार चांगला आहे. आज तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. जे लोक सरकारी नोकरी करतायत त्यांच्यासाठी हा काळ चांगला असेल. तसेच, जे लोक अकाऊंट, बिझनेस मॅजेटमेंटशी संबंधित आहेत त्यांना आज चांगला लाभ मिळेल. तुमच्या कुटुंबात आज आनंदी वातावरण असेल. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. आज तुम्हाला विविध स्त्रोतांमधून चांगला लाभ मिळेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. जे लोक विवाहित आहेत त्यांचं नातं अधिक घट्ट होईल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. या राशीच्या लोकांना पैशांची गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवा. तुमच्या कुटुंबात आनंदी आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळेल. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. या राशीच्या अकराव्या स्थानी चंद्र ग्रह आहे त्यामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल. जुने वाद लवकरच निटतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. मित्रांचा चांगला सपोर्ट तुम्हाला मिळेल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांना भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ घेता येईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना वाहन सुख मिळेल. तसेच वैवाहिक जीवनात चांगले बदग घडून येतील. 


हेही वाचा :                                                                                                                                                   


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Horoscope Today 7 May 2025 : आजचा दिवस 3 राशींसाठी खास! गणरायाच्या कृपेने सर्व विघ्न होतील दूर, प्रमोशन मिळण्याची संधी? वाचा आजचे राशीभविष्य