Astrology Panchang Yog 7 March 2025 : आज 7 मार्च म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. आज फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी आहे. आज प्रीति योगासह (Yog) मृगशिरा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून येणार आहे. तसेच, आजच्या दिवशी धन योगासह अष्टमी तिथीचा शुभ संयोग देखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. आज ज्या राशींना लाभ मिळणार आहे त्या राशींच्या लोकांच्या करिअरमध्ये अनेक बदल होतील. प्रगतीचे अनेक मार्ग उपलब्ध होतील.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. आज तुम्ही बिझनेसमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, एखादं रखडलेलं काम लवकरच पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी आलेल्या समस्या हळुहळू दूर होतील. तसेच, काही नवीन लोकांशी गाठीभेटी होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, जर तुम्हाला तुमच्या नोकरीत काही बदल करायचे असतील तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर चांगली कृपा असेल. भविष्यात चांगली गुंतवणूक करु शकता.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज कौटुंबिक सुख-सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात देखील आनंदी वातावरण पाहायला मिळेल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात जाल. तसेच, मुलांची अभ्यासामध्ये रुची दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. तसेच, आर्थिक सुख-सुविधांचा चांगला लाभ घ्याल. तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला दिसेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. बॅंक, अकाऊंटच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना आज चांगला लाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: