Astrology Panchang Yog 27 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 27 जुलै 2025 चा दिवस आहे. त्यानुसार, आजचा दिवस रविवार आहे. आजच्या दिवशी चंद्राने सिंह राशीत संक्रमण केलं आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्र आणि मंगळ ग्रहाची सिंह राशीत युती होणार आहे. त्यामुळे धन लक्ष्मी नावाचा शुभ संयोग जुळून येणार आहे. तसेच रवि योगाचा देखील शुभ संयोग जुळून आला आहे. 

Continues below advertisement


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.  



मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. त्यामुळे तुमची कामे सहजतेने पूर्ण होतील. नोकरदार वर्गातील लोकांना आपल्या मनाप्रमाणे काम करता येईल. रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने तुम्ही कुटुंबियांबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. 


कर्क रास (Cacer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज मित्रपरिवाराबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल. सोशल मीडियाचा तुम्ही जास्त वापर कराल. नवीन गोष्ट शिकण्यासाठी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे. 


तूळ रास
(Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस खास आहे. आजच्या दिवशी तुमच्या मार्गातील सर्व विघ्न दूर होतील. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आज धनप्राप्तीचे योग जुळून येणार आहेत. तसेच, तुम्हाला भौतिक सुख सुविधांचा लाभ घेता येईल. तुमच्यावर कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. लवकरच परदेशात जाण्याची संधी तुमच्यासाठी चालून येईल. तसेच, आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. मुलं आज नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतील. तसेच, संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, लवकरच तुम्ही धार्मिक यात्रेला सहभागी होऊ शकता. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :                                               


Astrology : रागीट, हट्टी आणि भयंकर डॉमिनेटिंग असतात 'या' 4 राशींचे लोक; स्वत:चंच म्हणणं खरं करण्याची असते सवय, वाचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये