Astrology Panchang Yog 16 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 16 जुलैचा दिवस आहे. आजचा दिवस हा गणपतीला समर्पित आहे. आजच्या दिवशी गणपतीसाठी (Lord Ganesha) उपवास ठेवला जातो. तसेच, आज चंद्राने मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे चंद्राचं देखील एक राशीचक्र पूर्ण झालं आहे. यासाठी आजचा दिवस खास आहे. आज सूर्याने संक्रमण करुन कर्क राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे कर्क राशीत सूर्य आणि बुध ग्रहाची युती होणार आहे. यामुळे बुधादित्य योग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. तुमच्या करिअरला चांगलं वळण लागेल. तसेच, उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. समाजातील काही प्रभावशाली लोकांबरोबर तुमच्या गाठीभेटी होतील. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा सपोर्ट मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस उमेदीचा असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेत पूर्ण करु शकाल. तसेच, नवीन योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकाल. करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायी असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासमोर उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांसाटी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्यास तुम्ही फार उत्सुक असाल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस फार सौभाग्यशाली असणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनाची स्थिती चांगली असेल. तसेच कोणतंही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी फार अनुकूल असणार आहे. पार्टनरशिपमध्ये तुम्ही काम सुरु करु शकता. आजच्या दिवसात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला असेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. आज तुम्ही काही कामासाठी जोखीम हाती घ्याल. तसेच, तुमच्या वाणीवर तुमचा ताबा राहील. नवीन गोष्टी शिकण्यास तुम्ही उत्सुक असाल. आनंदी वातावरण राहील.
हेही वाचा :