Astrology Panchang 6 October 2024 : आज रविवार, 6 ऑक्टोबर रोजी चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाणार आहे. तसेच आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी दुर्गा देवीचे चौथे रूप कुष्मांडा देवीची पूजा केली जाईल. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी प्रीति योग, रवि योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज अनेक स्त्रोतांमधून पैसे कमवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे उत्पन्न वाढेल आणि कुटुंबाच्या गरजा देखील पूर्ण होतील. रविवारच्या सुट्टीमुळे आज तुम्ही संपूर्ण कुटुंबासह नवरात्रीच्या पूजेत सहभागी व्हाल आणि गरबा खेळायलाही जाऊ शकता. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला मुलांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. संध्याकाळी तुम्ही मित्रांसोबत मजा करताना दिसाल.


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचादिवस शुभ असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज केलेल्या कामातून समाधान मिळेल आणि त्यांचं आरोग्यही चांगलं राहील. नवरात्रीमुळे आज घरात धार्मिक वातावरण असेल आणि तुम्हाला संपूर्ण कुटुंबासह देवीची आरती करण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांना रविवारच्या सुट्टीचा फायदा होईल, ज्यामुळे ग्राहकांची संख्या वाढेल आणि विक्री वाढेल. कुटुंबात काही वाद चालू असतील तर ते आज मिटतील. आज तुम्हाला तुमच्या आईसोबत काही नातेवाईकांच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल, जिथे तुमचं खूप स्वागत केलं जाईल.


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कन्या राशीच्या लोकांच्या जीवनशैलीत आज सुधारणा दिसून येईल आणि ते त्यांच्या हुशारीने इतरांकडून त्यांची कामं सहज करून घेऊ शकतील. आज तुम्हाला अचानक एखादा जुना मित्र भेटू शकतो, ज्याच्यासोबत तुम्ही जुन्या आठवणी ताज्या कराल. अविवाहित लोकांना आज एक चांगला विवाह प्रस्ताव येऊ शकतो. आज दिवसभर तुम्ही तुमच्या जोडीदारावर नाराज राहाल, पण परस्पर प्रेम कायम राहील. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच 6 ऑक्टोबरचा दिवस आनंदाचा असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदित होईल. तुमचं एखादं काम प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होईल. आज व्यावसायिकांना इतर व्यवसायात गुंतवणूक करण्याची संधी मिळेल, ज्यातून भविष्यात चांगला नफा मिळेल. रविवारच्या सुट्टीमुळे आज नवीन पदार्थ बनवता येतील, ज्यामुळे तुमचं मन आणि पोट दोन्ही तृप्त होईल.


कुंभ रास (Aquarius Horoscope)


आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. जे लोक परदेशात जाण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. जे लोक प्रेम जीवनात आहेत ते आज रात्री बाहेर जेवण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्याचा विचार करू शकतात. अविवाहित लोकांना लग्नाचा चांगला प्रस्ताव येऊ शकतो. सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला आज अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि समाजात तुमचा मानही वाढेल. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 06 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य