Astrology Panchang 30 December 2024 : आज सोमवार, 30 डिसेंबर रोजी चंद्राचं धनु राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून या तिथीला सोमवती अमावस्या पूजन केलं जातं. याशिवाय 2024 सालची ही शेवटची अमावस्या असून सोमवती सोमवती अमावस्येच्या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग आणि मूल नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन (Gemini Today Horoscope)
आज म्हणजेच सोमवती अमावस्या मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज प्रत्येक काम लवकर करायला आवडेल आणि तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला थकवा जाणवणार नाही. सोमवती अमावस्येमुळे घरात पूजा आणि धार्मिक कार्य घडतील. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी तुमच्याकडे काही योजना असल्यास, ती आज पूर्ण होईल आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी देखील मिळेल. जर तुम्हाला भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. संध्याकाळ कुटुंबासोबत हसत-खेळत घालवाल.
सिंह (Leo Today Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. सिंह राशीचे लोक आज आपल्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवतील आणि पैशाची कमतरता नसल्यामुळे ते स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या सहज पार पाडतील. महादेवाच्या कृपेने आज आर्थिक लाभ होण्याची विशेष शक्यता आहे, ज्याचा उपयोग तुम्ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी कराल. आज शिक्षणात येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यात विद्यार्थी यशस्वी होतील. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल.
तूळ (Libra Today Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस आनंदाचा असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज सकाळपासून खूप उत्साही वाटेल. तुमचं आरोग्य उत्तम राहील. आज भगवान शंकराच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो आणि तुम्ही पैशाची बचत देखील करू शकाल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमचा बँक बॅलन्स देखील वाढेल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर आज तुम्ही तुमच्या प्रतिभेच्या जोरावर चांगला नफा कमवू शकाल. तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील आणि नाते अधिक घट्ट होईल.
वृश्चिक (Scorpio Today Horoscope)
आज सोमवती अमावस्येचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. तुमचे कोणतेही सरकारी किंवा इतर काम खूप दिवसांपासून अडकले असेल तर ते आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. या राशीच्या ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होईल असे दिसते. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांची इच्छा आज पूर्ण होईल आणि तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा देखील मिळू शकेल. तुम्ही कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये अडकले असाल तर आज तुम्हाला दिलासा मिळेल.
धनु (Sagittarius Today Horoscope)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. तुमच्या मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छाही पूर्ण होईल. अविवाहित लोकांसाठी आज चांगले स्थळ येऊ शकते, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना खूप आनंद होईल. जे लोक लव्ह लाईफ जगत आहेत ते आज त्यांच्या जोडीदारास भेटून भविष्यातील योजनांवर चर्चा करतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहील, ते आपल्या कामाने सर्वांना प्रभावित करतील. जर तुमचा तुमच्या भावासोबत काही वाद होत असेल तर तोही आज संपेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: