Astrology Panchang 23 January 2025 : आज म्हणजेच गुरुवार, 23 जानेवारीला गुरु वृषभ राशीत प्रवेश करेल तर चंद्र आज वृश्चिक राशीत येईल. याशिवाय आज सूर्याचं सुद्धा श्रावण नक्षत्रात संक्रमण होणार आहे. आज चंद्र विशाखा नक्षत्रातून अनुराधा नक्षत्रात जाईल, हा देखील एक शुभ योग आहे. अशा स्थितीत आज अमला नावाचा शुभ योगही तयार होत आहे. या योगांमुळे आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस रोमांचक असेल. तुम्ही तुमच्या करिअर आणि कामाबद्दल सकारात्मक राहाल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना या संदर्भात चांगली बातमी मिळेल. आज नोकरीत तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि अधिकाऱ्यांचं वर्तन तुमच्याशी अनुकूल व सहकार्याचं राहील. आज तुम्ही पैसे गुंतवून तुमचा व्यवसाय वाढवू शकता. या राशीचे विद्यार्थी आज त्यांच्या शिक्षणाबाबत गंभीर दिसतील आणि त्यांना शिक्षक आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. प्रेम जीवनाच्या बाबतीत, आजची संध्याकाळ तुमच्यासाठी विशेष आनंददायी असेल. काही धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होण्याचा योग संभवतो. आर्थिक बाबतीत दिवस संतुलित राहील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. तुमच्या बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने तुम्ही आज व्यवसायात आणि कामाच्या ठिकाणी यश मिळवाल. आज परदेशातूनही तुम्हाला लाभ मिळू शकतो. आज तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीलाही भेटू शकाल, ज्यांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी भविष्यात प्रगतीचे दार उघडेल. आज व्यवसायात चांगली कमाई करू शकाल. नोकरीत तुम्हाला सहकाऱ्यांकडून विशेष सहकार्य मिळेल. धनसंचय करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल.सायन्स आणि अकाऊंट्समध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष शुभ असणार आहे.
मकर रास (Capricorn)
चंद्र आणि सूर्याच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुम्हाला आदर मिळेल. सरकारी क्षेत्रातील कामातही आज तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही कोणत्याही परदेशी क्षेत्राशी किंवा संस्थेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठीही दिवस तुमच्या अनुकूल असेल. तुमच्या कामात आणि नियोजनात तुम्हाला आज तुमच्या कुटुंबाकडूनही सहकार्य मिळेल. आज तुम्हाला मित्रांकडूनही मदत मिळेल. आर्थिक बाबींमध्ये आज तुम्हाला तुमच्या योजनेचा लाभ मिळेल. आज तुमचे खर्च कंट्रोलमध्ये असतील. शुभ कार्यावर काही पैसे खर्च केल्याने देखील तुम्हाला आनंद मिळेल. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: