Astrology Panchang 21 December 2024 : आज शनिवार, 21 डिसेंबर रोजी चंद्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी प्रीति योग, केंद्र योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन (Gemini Today Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांची सामाजिक प्रतिमा आज शनिदेवाच्या कृपेने सुधारेल. गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात जर काही गोंधळ सुरू असेल, तर तो आज संपेल आणि तुमच्या सर्व गोष्टी नीट घडतील. व्यवसाय करणाऱ्यांना आज नफ्याच्या चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे चांगला नफा मिळेल आणि व्यवसायातही प्रगती होईल. नोकरी करणारे आज मित्रांसोबत नवीन वर्षाच्या योजना बनवतील आणि त्यांची कामं वेळेवर पूर्ण करतील. आज घरी विशेष पाहुणेही येऊ शकतात.
कन्या (Virgo Today Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही आनंदी मूडमध्ये दिसाल. लव्ह लाईफमध्ये काही समस्या येत असतील तर आज आपण त्यात सुधारणा कराल, ज्यामुळे समस्या दूर होईल आणि नात्यात गोडवाही वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना आज कामानिमित्त परदेशात जाण्याची किंवा इतर शहरांमध्ये जाण्याची संधी मिळेल, ज्यामुळे व्यवसायात प्रगतीचा मार्ग खुला होईल. जर तुमचे पैसे एखाद्या मित्राकडे अडकले असतील तर ते आज परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांती राहील आणि सर्व सदस्यांचे आरोग्यही चांगले राहील.
तूळ (Libra Today Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. पैशांमुळे बरेच दिवस रखडलेली कामं आज पूर्ण होतील. मालमत्ता व वाहन खरेदीची इच्छाही पूर्ण होईल. आज तुम्हाला काही सरकारी योजनेचा लाभ मिळताना दिसत आहे. शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना आज चांगला फायदा होईल. आज अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि सुख-सुविधांमध्ये वाढ होईल.
धनु (Sagittarius Today Horoscope)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी असणार आहे. शनिदेवाच्या कृपेने अडकलेले पैसे आज मिळू शकतात आणि जे भाड्याने राहतात ते आज स्वतःचं घर देखील खरेदी करू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांना सरकारी नोकरीही मिळू शकते. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायद्याच्या नवीन संधी मिळतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमचा अनुभवही वाढेल.
मीन (Pisces Today Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. मीन राशीचे लोक त्यांच्या बुद्धीने सर्वत्र यश मिळवू शकतात आणि वडिलोपार्जित मालमत्तेतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन काम सुरू करायचं असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. विद्यार्थी कोणत्याही परदेशी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा विचार करत असतील तर आजचा दिवस त्यांच्यासाठी चांगला असेल. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत एक महत्त्वाचं काम सोपवलं जाऊ शकतं, जे तुम्ही सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. विवाहित लोकांना आज त्यांच्या जोडीदार आणि मुलांसोबत चांगला वेळ घालवण्याची आणि कुठेतरी बाहेर जाण्याची संधी मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: