Astrology 19 June 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज बुधवार, 19 जूनला चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून ही तिथी प्रदोष व्रत म्हणून ओळखली जाते. बुधवारी प्रदोष तिथी असल्याने ही तिथी बुध प्रदोष व्रत म्हणून ओळखली जाईल. या दिवशी सिद्ध योग, अमृत सिद्धी योग, रवियोग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. मेष राशीचे लोक आज उत्साही दिसतील आणि तुमची सर्व कामं आपोआप पूर्ण होतील. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांना आज या दिशेने यश मिळू शकतं. जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर आज तुम्हाला त्यातून आराम मिळेल आणि पूर्वीपेक्षा बरं वाटेल. नोकरदार लोक आज मजेच्या मूडमध्ये असतील आणि सहकाऱ्यांच्या मदतीने कार्यालयीन कामं पूर्ण करतील. त्याच वेळी, व्यावसायिकांना चांगला नफा होईल आणि ते इतर काही व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करतील. कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचं तर, कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. भाऊ-बहिणीमध्ये परस्पर प्रेम असेल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांची पूर्ण काळजी घ्याल.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज सांसारिक सुख मिळेल आणि आवडत्या घरगुती वस्तू खरेदी करता येतील. पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जमीन आणि वाहन खरेदी शक्य आहे. व्यावसायिकांना चांगला नफा मिळवण्याच्या उत्कृष्ट संधी मिळतील. नोकरदार लोक आज कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील आणि कामावर आपला ठसा उमटवतील. लव्ह लाईफबद्दल बोलताना, आज तुम्ही तुमच्या कुटुंबाला तुमच्या प्रियकराबद्दल सांगू शकता, ते तुमच्या नात्याला ग्रीन सिग्नल देतील. तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम अडकलं असेल तर ते आज कुटुंबातील सदस्याच्या मदतीने पूर्ण होईल.


सिंह रास (Leo)


आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. अचानक आलेल्या पाहुण्यांच्या आगमनाने मन प्रसन्न राहील आणि घरात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांशी भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी व्यावसायिक नवीन डावपेच आखू शकतात आणि प्रतिस्पर्ध्यांसमोर त्यांची प्रतिष्ठाही वाढेल. नोकरदारांना आज करिअरच्या प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील आणि अधिकाऱ्यांचंही पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या पालकांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुम्ही त्यांना विशेष भेटवस्तू देखील देऊ शकता.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. आज बाप्पाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांनी केलेली कामं पूर्ण होऊ लागतील आणि तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमचा अध्यात्मिक कार्याकडे अधिक कल असेल आणि प्रदोष काळात उपासनेकडे अधिक कल असेल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. नोकरदार लोक आणि व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कुटुंबातील मोठ्या व्यक्तीचा सल्ला घ्याल आणि त्यांचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल. काम लवकर संपवून संध्याकाळी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. वैवाहिक जीवनात मतभेद होत असतील तर आज ते मतभेद चर्चेतून मिटतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 19 June 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? तुमचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या