Astrology Panchang 19 December 2024 : आज 19 डिसेंबरचा दिवस म्हणजेच गुरुवारचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजचा दिवस दत्तगुरुंना समर्पित आहे. तसेच, आज मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी तिथी आहे. तसेच, आजच्या दिवशी समसप्तक योग (Yog) जुळून आला आहे. त्याचबरोबर शुभ योग आणि आश्लेषा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून येणार आहे त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम पाच राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. या पाच राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमच्या नेतृत्व क्षमतेत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, शिक्षकांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या घरातील आर्थिक स्थिती चांगली असेल. तुम्ही व्यापार करत असाल तर तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होण्यीच शक्यता आहे. आज तुमचे थांबलेले काम लवकर पूर्ण होईल. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असमार आहे. आज तुम्हाला कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा लागेल. तसेच, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असाल. व्यापारी वर्गातील लोकांना आज तुम्हाला तुमच्या व्यवसायातून चांगला नफा मिळेल. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असमार आहे. आज देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. तसेच, तुमच्यावर आलेली संकटं हळूहळू नाहीशी होतील. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. जर तुम्ही नवीन व्यवसायाचा विचार करता आहात तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरची सुरुवात चांगली होईल. तसेच, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला पार्टनरचा चांगला सपोर्ट मिळेल. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुमचं मन प्रसन्न असेल. तसेच, विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाबाबत तुम्हाला चांगली वार्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली वाढ होईल. तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याची शक्यता आहे. एकूणच तुमचं मन प्रसन्न असेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 19 December 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? कोणाला मिळणार लाभ? वाचा आजचे राशीभविष्य