Astrology Panchang 16 January 2025 : आज 16 जानेवारीला पुष्य नक्षत्रासोबत गजकेसरी योग जुळून येत आहे. यासोबतच आज आयुष्मान योग देखील असेल. आश्लेषा नंतर आज मघा नक्षत्राचा योगायोग असेल. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 3 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ (Taurus Horoscope Today)


वृषभ राशीसाठी आजचा गुरुवार खूप चांगला जाणार आहे. तुम्ही जे काही काम हाती घेतलं आहे त्यात तुम्हाला यश मिळेल, विशेषत: दुपारनंतर. आर्थिक बाबतीत तुमची कमाई वाढेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही यश मिळेल. तुमच्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन आणि सहकार्य तुम्हाला लाभेल. तुमच्या काही जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला मालमत्तेत गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठीही दिवस तुमच्या अनुकूल असेल.


सिंह (Leo Horoscope Today)


आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत केलेल्या प्रयत्नांमुळे सकारात्मक परिणाम देईल. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातूनही लाभ मिळू शकतो. राजकारण, सामाजिक कार्याशी निगडित असलेल्यांचा जनसमर्थन वाढेल. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. जर तुमचं काम परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला लाभ होईल. व्यवसायात तुमच्या सहकाऱ्यांचेही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही आधी एखाद्याला कर्ज दिलं असेल तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करू शकता.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


भगवान विष्णूच्या कृपेने कुंभ राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. तुमचे विरोधक आणि शत्रूही शांत राहतील आणि तुमच्या कार्यक्षमतेची आणि कार्यशैलीची प्रशंसा करतील. नोकरीच्या ठिकाणी प्रगती आणि पगारवाढ होऊ शकते. अधिकारी तुमचं काम समजून घेतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही काही नवीन काम आणि प्रकल्प सुरू करू शकाल. कुटुंबात वडिलांचं आरोग्य चांगलं चाललं असेल तर त्यांची प्रकृती सुधारेल. आज तुमचे कुटुंबीयही तुमचं ऐकतील आणि तुमचा आदर करतील. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव असेल तर तोही दूर होऊ शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Mangal Yog 2025 : मंगळ बनवणार शक्तिशाली योग; 12 एप्रिलपासून उजळणार 3 राशीचं नशीब, पडणार पैशांचा पाऊस