Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा धैर्य, ऊर्जा, शौर्य, नाती यांचा कारक मानला जातो. मंगळाला ग्रहांचा सेनापती देखील म्हटलं जातं. मंगळाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. राशीप्रमाणे मंगळ विशिष्ट कालावधीनंतर नक्षत्रही बदलतो. सध्या मंगळ पुनर्वसु नक्षत्रात स्थित आहे. परंतु 12 एप्रिलला सकाळी 6:32 वाजता मंगळ पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. अशा स्थितीत शक्तिशाली मंगळ-पुष्य योग तयार होईल, ज्याचा सकारात्मक परिणाम 3 राशींवर होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळ-पुष्य योग फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात भरीव यश मिळू शकतं. करिअरविषयी बोलायचं झाल्यास, तुम्हाला प्रचंड यश मिळू शकतं, तसेच मोठे आर्थिक लाभही मिळू शकतात. नोकरी बदलण्याचीही विचार तुम्ही करू शकता. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल. पैसे कमवण्यासोबतच तुम्ही बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. लव्ह लाईफ उत्तम राहील.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळ-पुष्य योग खूप फलदायी ठरू शकतो. या राशीच्या चढत्या घरात मंगळ राहणार आहे. अशा स्थितीत कर्क राशीच्या लोकांना नोकरीमध्ये अनेक नवीन संधी मिळू शकतात. नोकरीशी संबंधित बाबींमध्ये बरंच यश मिळू शकतं. तुम्हाला व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. स्टॉक्सद्वारे तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलल्यास, तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुमचं आरोग्य चांगलं राहील.


कन्या रास (Virgo)


या राशीच्या लोकांसाठी मंगळ-पुष्य योग खूप भाग्याचा ठरू शकतो. कन्या राशीच्या लोकांना अचानक किंवा वडिलोपार्जित मालमत्तेद्वारे बरेच फायदे मिळू शकतात. तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही खूप प्रगती कराल. व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही सर्व क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकता. आर्थिक स्थिती अनुकूल राहील. तुम्ही जास्तीत जास्त पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. या काळात तुमचं आरोग्य ठणठणीत राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shukra Gochar 2025 : अवघ्या 48 तासांत पालटणार 3 राशींचं नशीब; शुक्राचा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ