Astrology Today 15 April 2024 : आज, सोमवार, 15 एप्रिल, चैत्र नवरात्रीची सातवी माळ आहे, ही तिथी महा सप्तमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी देवी दुर्गेची सातवी शक्ती कालरात्रीची पूजा केली जाते. तसेच आज चंद्र कर्क राशीत जाणार आहे. चैत्र नवरात्रीच्या सातव्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांमध्ये सुकर्म योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. वृषभ राशीचे लोक आज आर्थिक स्थिरता अनुभवतील, आज त्यांच्या जीवनात आनंद असेल. तुमची स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रम घ्या. महादेवाच्या कृपेने सर्व प्रकारच्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सज्ज असाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचं लग्न ठरू शकतं, ज्यामुळे कुटुंब आनंदी असेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल आणि तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही मनोरंजनावर जास्त पैसे खर्च करू शकता.


कर्क रास (Cancer)


आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला परिणाम देणारा आहे. कर्क राशीच्या लोकांना आज पैसे कमवण्याची आणि त्यांच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेण्याची चांगली संधी मिळू शकते. तुमच्या मेहनतीने तुम्ही तुमच्या क्षेत्रात नाव कमवू शकाल आणि तुमची स्वप्नं पूर्ण करू शकाल. नोकरदार लोकांचे कामावर सर्वांशी चांगले संबंध राहतील. तुम्ही तुमचे काम इतरांकडून सहज करून घेऊ शकाल. तुम्हाला मित्रांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत कोणत्याही मुद्द्यावर काही वाद असेल तर तो आज बोलून सोडवला जाईल आणि तुम्हाला संपूर्ण कुटुंबासह धार्मिक स्थळी जाता येईल.


सिंह रास (Leo)


आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. महादेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांच्या सर्व समस्या हळूहळू संपतील आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ झाल्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि तुम्हाला आर्थिक समृद्धीही मिळेल. नोकरदार लोक आज त्यांच्या कामाने वरिष्ठांना प्रभावित करण्यात यशस्वी होतील आणि बॉस देखील सर्वांसमोर तुमच्या कामाची प्रशंसा करेल. या राशीचे पती-पत्नी आज एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकतील, ज्यामुळे परस्पर बंध मजबूत होतील. तुमच्या भावा-बहिणींसोबत तुमचे संबंध चांगले राहतील.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तूळ राशीचे लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करतील, ज्यामध्ये ते आयुष्यात यशस्वी होतील. संपूर्ण कुटुंबाच्या पाठिंब्याने आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घेतले जातील. जर तुमच्या लग्नाची चर्चा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा असू शकतो, घरामध्ये लवकरच शुभ कार्याची तयारी केली जाऊ शकते. आज तुमची कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल आणि तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडतील. जर तुम्हाला खूप दिवसांपासून जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा असेल तर आज तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदी असेल आणि आर्थिक बाबींमध्ये लाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू देखील खूप मजबूत असेल.


मकर रास (Capricorn)


आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज त्यांच्या कामात चांगलं यश मिळेल. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा प्रसार करण्यात आणि इतरांना मार्गदर्शन करण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल तर आज तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. विवाहासाठी पात्र लोकांना आज चांगला विवाह प्रस्ताव येऊ शकतो. नोकरी करणारे आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस शुभ आहे, ते आपापल्या क्षेत्रात चांगली प्रगती साधतील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत खूप आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुमच्या भावंडांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅनही तुम्ही कराल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : तब्बल 55 वर्षांनंतर बनला शक्तिशाली चतुर्ग्रही योग; वृषभसह 'या' 3 राशींना मिळणार आर्थिक लाभाच्या संधी, करिअरमध्ये गाठाल अनोखी उंची