Astrology Panchang Yog 30 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 30 मे चा दिवस म्हणजेच आजचा वार शुक्रवार. आज चंद्राने कर्क राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आज शुक्रवार असल्या कारणाने अनेक राशींवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे आज मालव्य नावाचा शुभ योगदेखील जुळून आला आहे. तसेच, आजच्या शुभ राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. आज धन योगासह अनेक शुभ योगाचा संयोग जुळून आला आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुमची सर्व आर्थिक समस्यांपासून सुटका होईल. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. घरातील वातावरण शुभ असणार आहे. तसेच, तुमची नियोजित कामे तुम्ही वेळेवर पूर्ण करु शकाल. भावा-बहिणींबरोबर चांगले संबंध निर्माण होतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या प्रभावशालीत वेगळेपणा दिसून येईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ घ्याल. तुमचं वैवाहिक जीवन फार सुरळीत चालेल. तसेच, मित्र-मैत्रीणींचा सपोर्ट तुम्हाला मिळेल. तुमचं आरोग्य चांगलं राहील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुम्हाला जर नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जोडीदाराबरोबर चांगले संबंध निर्माण होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमच्या सुख सुविधांमध्ये चांगली वाढ निर्माण होईल. आज तुम्ही दानधर्म कराल. आज तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमची सर्व आर्थिक समस्यांपासून सुटका होईल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर चांगली कृपा असणार आहे. तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवा. लवकरच, तुमचे प्रवासाचे योग जुळून येणार आहेत.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)