Weekly Horoscope : नवीन आठवडा 13 मे पासून सुरू होत आहे. हा येणारा आठवडा अनेक राशींसाठी खास असणार आहे. या आठवड्यात सूर्य देव आपली राशी बदलणार आहे. 14 मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल, सूर्याच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशींचं भाग्य उजळेल. या आठवड्यात 3 राशींवर सूर्यदेवाची कृपा राहील. या भाग्यवान राशींबद्दल (Weekly Lucky Zodiac Signs) जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
13 मे पासून सुरू होणारा नवीन आठवडा मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक नवीन संधी मिळतील. तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती होईल. पैशांबाबत काही चांगली बातमी मिळू शकते.
या आठवड्यात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील. पदोन्नती किंवा पगारवाढीचीही बातमी मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकाल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. सूर्याच्या आशीर्वादाने या आठवड्यात तुमचं आरोग्यही चांगलं राहील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात खूप सकारात्मक परिणाम मिळतील. या आठवड्यात तुमचं जोडीदारासोबतचं नातं अधिक दृढ होईल. या राशीच्या लोकांना कुठूनतरी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या करिअरबाबत तुम्हाला चांगली बातमी मिळेल.
कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला करिअर आणि पैशाशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकते. नवीन आठवड्यात तुम्हाला परदेशातून नोकरीची ऑफर येऊ शकते.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांची प्रलंबित कामं या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन कमाईचं स्रोत मिळू शकतं. या आठवड्यात तुमची स्थिती आर्थिकदृष्ट्या बळकट असेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात तुम्ही आत्मविश्वास आणि उर्जेने परिपूर्ण असाल. तुम्ही अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घ्याल, जे तुमच्या बाजूने असतील. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप छान असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :