Panchang 12 August 2024 : आज, 12 ऑगस्ट, श्रावणाचा दुसरा सोमवार असून या दिवशी चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. आज बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे धनलक्ष्मी योग तयार होत आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी धनलक्ष्मी योगासह शुक्ल योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. आज बनत असलेल्या शुभ योगांचा 5 राशींना फायदा होणार आहे, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन उत्साह घेऊन आला आहे. महादेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांची प्रलंबित सरकारी कामं आता पूर्ण होऊ शकतात. व्यापार क्षेत्रात सुधारणा होईल आणि उत्पन्नाच्या नवीन संधीही उपलब्ध होतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आज चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आज उत्तम संधी मिळू शकतात.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. कर्क राशीच्या लोकांचं आरोग्य आज चांगलं राहणार आहे आणि तुम्हाला तुमच्या कामात खूप समाधान मिळेल. शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्याही स्पर्धेत यश मिळाल्यास विद्यार्थी आज आनंदी होतील. नोकरदार लोक आज त्यांच्या क्षेत्रात सकारात्मक बदल पाहतील. श्रावणी सोमवारमुळे घरात धार्मिक वातावरण असेल. सासरच्या लोकांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होईल. संध्याकाळी लहान मुलांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल.
कन्या रास (Virgo)
आज कन्या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक दिवस असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आज कामात यश मिळेल आणि परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. प्रेम जीवनात असणारे आज एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतील. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल, त्यांना भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो. या राशीच्या ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे त्यांना आज या दिशेने शुभ संकेत मिळतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio)
आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन आला आहे. वृश्चिक राशीच्या राशीच्या लोकांची जी कामं खूप दिवसांपासून रखडलेली होती ती आजपासून हळूहळू पूर्ण होतील. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून मदत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला गोष्टी नीटपणे समजतील. व्यवसायात अधिक पैसे गुंतवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरदार लोकांना आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंददायी असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेली सर्व कामं आज यशस्वी होतील. कौटुंबिक सदस्यांच्या पाठिंब्याने तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील आणि तुमची संपत्ती वाढेल. जर तुम्ही पार्ट टाइम जॉब करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठी वेळ काढता येईल. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज चांगला निकाल मिळेल, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. व्यवसाय करणारे आज शंकराच्या कृपेने मोठी कमाई करतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shravan 2024 : आज श्रावणातील दुसरा सोमवार; महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?