Shravan Somvar Wishes In Marathi : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला फार महत्व आहे. शिवभक्तीसाठी असलेला हा श्रावण महिना 5 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. हा महिना अनेक सण-समारंभ, व्रत-वैकल्यांनी भरलेला असतो. या महिन्यातील प्रत्येक दिवस खास असतो. 5 ऑगस्टपासून सुरू झालेला श्रावण महिना 3 सप्टेंबरला संपन्न होईल. या निमित्त तुमच्या प्रियजनांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे खास संदेश (Shravan Somvar Wishes in Marathi) पाठवू शकता.
श्रावणी सोमवार शुभेच्छा संदेश (Shravan Somvar Wishes In Marathi)
महादेवाला करू वंदन
वाहू बेलाचे पान
महादेवा, सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंद माझ्या मनात माईना,
सृष्टी सजली बदलली दृष्टी
घेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणी
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या मन भरून शुभेच्छा!
श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
महाकाल नावाची किल्ली
उघडेल तुमच्या नशिबाची खिडकी,
होतील सर्व कामे पूर्ण तुमची
श्री शिव शंकराची हीच महती,
ओम नम: शिवाय
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
परंपरेचे करूया जतन
आला आहे श्रावण...
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या
आला तो श्रावण पुन्हा आला…
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
पवित्र श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!
निसर्ग आलंय बहरून,
मनही आलंय मोहरून,
रंगात तुझ्या नहाण्या,
मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सणासुदीची घेऊन उधळण
आला रे आला हसरा श्रावण!
श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!
ओम नमः शिवाय
बम बम भोले
श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे
शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!
चाहूल तुझी लागताच येते मन बहरून
अशा या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा!
हेही वाचा: