Astrology Panchang 11 September 2024 : आज बुधवारी, 11 सप्टेंबरला चंद्र धनु राशीत जाणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी गौरी पूजनाचा सण साजरा केला जातो. गौरी पूजनाच्या दिवशी रवियोग, प्रीति योग, आयुष्मान योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
गौरी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर तयार झालेला गजकेसरी योग तुमच्या जीवनात समृद्धी आणि आनंद घेऊन येईल. तुमच्याकडे आज पैसे मिळवण्याची शुभ संधी आहे आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रचंड फायदेही मिळतील. अनेक उत्तम संधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात आणि तुम्हाला व्यवसायातही चांगलं उत्पन्न मिळेल. तुमची एखादी इच्छा बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिली असेल तर ती यावेळी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या योजनांची कोणाशीही चर्चा करू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
कर्क रास (Cancer)
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कर्क राशीचे लोक आज धार्मिक कार्यात रुची वाढवतील. विद्यार्थ्यांना आज परीक्षेशी संबंधित काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. नोकरीतील लोकांचे आज सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील आणि ते कामाच्या ठिकाणी चमकदार कामगिरी करतील. आज व्यवसायात फायदा होईल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज त्यांच्या मुलांकडून किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोक रविवारच्या सुट्टीचा आनंद घेतील आणि पुढच्या दिवसाचे नियोजनही करतील. आज तुम्ही तुमच्या चैनीच्या वस्तूंवर थोडे पैसे खर्च करू शकता आणि कुटुंबातील सदस्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंवा मोबाईल लॅपटॉप किंवा इतर गॅझेट खरेदी करू शकता.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज अचानक उत्पन्नाचं स्रोत उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते, ज्याची ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला आज तयार होत असलेल्या महालक्ष्मी योगाचा लाभ मिळेल, तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळेल. नोकरी करणारे लोक त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांचं काम वेळेवर पूर्ण करू शकतील. तुमच्या वैवाहिक जीवनात काही कलह चालू असतील तर ते आज संपतील आणि तुम्ही एकमेकांना पुरेसा वेळ द्याल. घरातील लहान मुलांसोबत हसत-खेळत संध्याकाळ घालवाल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज मीन राशीचे लोक मोठ्या समस्यांना सामोरे जाण्यास सक्षम असतील. आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात प्रगतीच्या चांगल्या संधी असतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला फायदा होईल. आज जर नशीब तुमच्या बाजूने असेल तर तुमच्या सर्व चिंता दूर होतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि प्रत्येक टप्प्यावर संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :