Astrology Panchang 09 January 2025 : आज गुरुवार, 9 जानेवारीला चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशीत जाणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून या दिवशी रवियोग, साध्य योग आणि भरणी नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष (Aries Horoscope Today)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक राहील. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. आज केवळ तुमचे अधिकारीच नाही, तर तुमचे सहकारीही तुमच्या कामाची प्रशंसा करतील. मोठा भाऊ आणि वडिलांकडूनही लाभ मिळेल. जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचा फायदा देखील मिळू शकतो. तुमच्या बोलण्या-वागण्यात सकारात्मकता असेल, ज्याचा लोकांवर प्रभाव पडेल. व्यावसायिक लोकांना व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल आणि ते त्यांचा व्यवसाय आणखी वाढवण्याचा विचार करू शकता.
वृषभ (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांना 9 जानेवारीला गुरु ग्रहाच्या आशीर्वादाचा विशेष फायदा होईल. तुमच्यात धर्म आणि अध्यात्माची आवड निर्माण होईल. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. तुम्ही तुमच्या व्यवस्थापन क्षमतेचा, ज्ञानाचा आणि अनुभवाचाही फायदा घेऊ शकाल. तुमचे अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होतील आणि तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण होतील. तुम्हाला काही मोठी जबाबदारी देखील दिली जाऊ शकते. जे लोक नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनाही आज चांगली संधी मिळू शकते.
कर्क (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांना दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास फायदा होईल. तुमची कोणतीही मोठी इच्छा जी बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिली आहे ती पूर्ण होऊ शकते. तुमच्या सासरच्या लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवल्याने तुम्हाला आज फायदा होऊ शकतो. तुमचं मन धर्म आणि अध्यात्माकडे आकर्षित होईल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्यात यश मिळेल. दूरच्या नातेवाईकांकडूनही लाभ मिळू शकतो.
सिंह (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांना नोकरीत पदाच्या प्रभावाचा लाभ मिळेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं कोणतेही महत्त्वाचं काम आज अधिकारी किंवा अनुभवी व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकतं. ज्या लोकांचं काम आणि व्यवसाय परदेशाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आणि लाभदायक असेल. बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून तुम्ही पैसे वाचवू शकता. जुनी गुंतवणूक तुम्हाला लाभ देईल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीला जुन्या ओळखीच्या आणि मित्रांच्या सहकार्याचा फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या मदतीचा फायदा होईल. तुम्हाला आवडेल असं काही कामही तुम्हाला मिळू शकतं. संध्याकाळी कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा दिसेल. दूर राहणाऱ्या नातेवाईकांकडूनही तुम्हाला चांगली बातमी मिळेल. मालमत्तेशी संबंधित काही प्रकरण असेल तर त्यात यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: