Horoscope Today 09 January 2025 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Today Horoscope)


आजचा दिवस उत्साहाचा असेल आणि नवीन उर्जेने भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मेहनतीचं फळ मिळेल. व्यवसायात नवीन प्रकल्पावर काम सुरू करू शकता. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुमचं आरोग्य चांगलं राहील.


वृषभ (Taurus Today Horoscope)


आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा संघर्षाचा असू शकतो. एखाद्या विषयाबाबत मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. तुमचा मुद्दा स्पष्टपणे मांडा. फालतू खर्च टाळा. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.


मिथुन (Gemini Today Horoscope)


आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर राहील. जुनी प्रलंबित कामं पूर्ण होतील. नवीन व्यक्ती भेटणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नात्यात गोडवा येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.


कर्क (Cancer Today Horoscope) 


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना यशस्वी होतील. मन:शांतीसाठी ध्यान किंवा योग करा.


सिंह (Leo Today Horoscope) 


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरीच्या ठिकाणी तुमचं नाव होईल. आज एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. आर्थिक बाबतीत सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या.


कन्या (Virgo Today Horoscope) 


आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी व्यस्त राहाल, परंतु त्याचे चांगले परिणाम मिळतील. कोणताही मोठा निर्णय आज घेऊ नका, तो पुढे ढकला. कौटुंबिक संबंधात काही गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो.


तूळ रास (Libra Today Horoscope) 


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी राहील. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नात्यात गोडवा येईल. आपल्या आरोग्याबाबत सावध राहा.


वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope) 


आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या. एखाद्याशी वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. ध्यान करा.


धनु रास (Sagittarius Today Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगलं राहील.


मकर रास (Capricorn Today Horoscope)


आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. ध्यान आणि योगा करुन मन शांत ठेवा.


कुंभ रास (Aquarius Today Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असू शकतो. आज वाद टाळा. कामाच्या ठिकाणी सावध राहा. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.


मीन रास (Pisces Today Horoscope)


आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर राहील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. नातेसंबंध अधिक दृढ होतील. नोकरीत नवीन प्रकल्पावर काम सुरू करू शकता. तुमचं आरोग्य चांगलं राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Mangal Transit 2025: सारं काही मंगलच 'मंगळ'! 12 जानेवारीनंतर 3 राशींची लॉटरी लागणार? मंगळाचा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...