Astrology 06 August 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आज मंगळागौरचा दिवस विशेष आहे. आज 6 ऑगस्टला श्रावणाचा पहिला मंगळवार असून या दिवशी चंद्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे, जिथे शुक्र आणि बुध ग्रह आधीच उपस्थित आहेत. सिंह राशीमध्ये शुक्र, बुध आणि चंद्र यांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे.
याशिवाय आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी त्रिग्रही योगासह लक्ष्मी नारायण योग, वरियान योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. आज बनत असलेल्या शुभ योगांचा 5 राशींना फायदा होणार आहे, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. मिथुन राशीचे लोक आज स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी होतील आणि समाजात तुमचा सन्मानही वाढेल. आर्थिक बाबतीत दिवस तुमच्या अनुकूल असेल, तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. सासरच्यांशी तुमचे संबंध सुधारतील. नोकरीत असलेल्या लोकांना आज त्यांच्या अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे ते त्यांचे काम वेळेवर पूर्ण करू शकतील. आज उद्योगपती नवीन व्यवसायात गुंतवणूक करतील.
कर्क रास (Cancer)
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कर्क राशीचे लोक आज धार्मिक कार्यात रुची वाढवतील. विद्यार्थ्यांना आज परीक्षेशी संबंधित काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. नोकरीतील लोकांचे आज सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील आणि ते कामाच्या ठिकाणी चमकदार कामगिरी करतील. आज व्यवसायात फायदा होईल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल.
कन्या रास (Cancer)
आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. कन्या राशीचे लोक आज आपल्या भविष्यातील योजना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतील, ज्यामध्ये नशीब पूर्ण साथ देईल. आज तुम्हाला शत्रूंपासून मुक्ती मिळेल. काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांपासून आज तुम्हाला दिलासा मिळू शकेल आणि तुम्हाला सरकारी योजनांचा लाभही मिळेल. अनेक मोठ्या लोकांशी तुमची ओळख वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल. त्याच वेळी, व्यावसायिक आज नवीन व्यावसायिक भागीदारांशी संपर्क स्थापित करतील, ज्यामुळे चांगले फायदे मिळतील.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तूळ राशीचे लोक मोठ्या समस्यांना सामोरे जाण्यास सक्षम असतील. आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात प्रगतीच्या चांगल्या संधी असतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला फायदा होईल. आज जर नशीब तुमच्या बाजूने असेल तर तुमच्या सर्व चिंता दूर होतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि प्रत्येक टप्प्यावर संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio)
आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन येईल. वृश्चिक राशीचे लोक आज स्वतः ठरवलेलं लक्ष्य साध्य करण्यात यशस्वी होतील. आज कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य उत्साहाने सहभागी होतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्ही ते चांगल्या ठिकाणी गुंतवू शकता. जुन्या आठवणीमुळे मनामध्ये आनंद राहील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर करण्यासाठी शिक्षकांचे सहकार्य मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :