Astrology Panchang 05 September 2024 : आज 5 सप्टेंबरचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज वेशी योग (Yog) जुळून आला आहे. सध्या सूर्य (Sun) सिंह राशीत (leo) विराजमान आहे. तर कन्या राशीत शुक्र ग्रह विराजमान आहे. हे दोन्ही ग्रह शुभ असल्या कारणाने आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा सिंह, तूळ धनुसह अन्य 5 राशींच्या (Zodiac Signs) लोकांना फायदा मिळणार आहे. या राशींच्या लोकांना अनेक सरप्राईज मिळू शकतात. तसेच, कुंडलीत ग्रहांची स्थिती अनुकूल असल्या कारणाने भगवान विष्णूचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुम्ही दिवसभर प्रसन्न असाल. तुम्हाला तुमच्या कामातून चांगला लाभ मिळेल. तसेच, गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी देखील आजचा दिवस शुभ आहे. जर, तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून तणावाचं वातावरण असेल तर ते आज दूर होऊ शकतं. तसेच, गणेशोत्सवाचे दिवस असल्या कारणाने तुमचं मनही फार प्रसन्न असेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. तसेच, समाजात तुमची मान-प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्ही घेत असलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. वैवाहिक जीवनातील वाद संपुष्टात येतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज तुमचं नशीब तुमच्या बरोबर असेल त्यामुळे तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज नाही. फक्त स्वभावात परोपकारी भाव ठेवा. इतरांना मदत करण्यासाठी स्वत:हून पुढे या. ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना एखादा मोठा प्रोजेक्ट हाती लागू शकतो. त्याचं वेळीच तुम्ही सोनं करा. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. कुटुंबियांच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्हाला दिवसभरात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. छोट्या-छोट्या गोष्टींतून तुम्हाला आनंद मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबातील वातावरण चांगलं असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :