Astrology Panchang 03 October 2024 : आज 3 ऑक्टोबरचा दिवस हा खास असणार आहे. कारण आजापसून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2024) सुरुवात झाली आहे. तसेच, आज अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी आहे. आजच्या दिवशी दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. तसेच, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी इंद्र योग (Yog), बुधादित्य योग आणि हस्त नक्षत्र योग असे शुभ संयोग जुळून आले आहेत त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार,  आजच्या दिवसाचा शुभ परिणाम 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशींची धार्मिक कार्यात रुची वाढेल तसेच अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. तसेच, सर्वांचीच मनं प्रसन्न असतील. आज तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी देखील प्रसन्न वातावरण असेल. तुमच्यावर कामाचा ताण जास्त नसणार. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सकारात्मक असणार आहे. देवी दुर्गेच्या कृपेने तुमच्या सर्व चिंता दूर होतील. तुम्हाला आज एखादी शुभ वार्ता ऐकायला मिळेल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या घरात देखील सकारात्मक वातावरण असेल. तुमच्या तब्येतीचा तुमच्या कामावर चांगला परिणाम दिसेल. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस फार चांगला जाणार आहे. तुम्हाला पदोपदी नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुमचं मन धार्मिक कार्यात जास्त रमेल. संध्याकाळच्या वेळी कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये तुमच्यावर काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या घरात आज धार्मिक वातावरण पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. देवीच्या कृपेने तुमच्याकडे उत्पन्नाचे अनेक नवीन स्त्रोत खुले होतील. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत झालेली दिसेल. तसेच, विद्यार्थ्यांचं अभ्यासात चांगलं मन रमेल. तुमच्या कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )


हे ही वाचा :


Shardiya Navratri 2024 : आजपासून नवरात्रीला सुरुवात; जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी