Astrology News : नखं कापण्यासाठी 'हा' आहे सर्वात शुभ दिन, अचानक होते धन-प्राप्ती, आरोग्यही राहतं उत्तम
Astrology News : सनातन धर्मात जीवनाशी संबंधित अनेक कामांचे नियम सांगण्यात आले आहेत. जर या नियमांचं पालन केलं तर देवी-देवता प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.
Astrology News : सनातन धर्मात जीवनाशी संबंधित अनेक कामांचे नियम सांगण्यात आले आहेत. जर या नियमांचं पालन केलं तर देवी-देवता प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. तर, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी केलेली कामे देवी-देवतांना नाराज करतात. यामुळे आयुष्यात दारिद्र्याचा सामना करावा लागू शकतो, तसेच, अनेक कामे बिघडतात. नखं कापणे हेदेखील याच कामांपैकी एक आहे. यामुळेच घरातील ज्येष्ठ व्यक्ती, आपले आई-वडील वारंवार केस आणि नखं कापण्यास सांगतात.
यासाठीच नखं कापण्यासाठी योग्य दिवस आणि योग्य वेळ कोणती हे जाणून घेणं गरजेचं आहे. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव असते.
'या' दिवशी चुकूनही नखं कापू नका
आठवड्यातील काही दिवस असे आहेत ज्यामध्ये नखं कापणं अशुभ मानलं जातं. या दिवसांत नखं कापल्याने आयुष्यात तंगी, कष्ट आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या प्रगतीत अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.
जसे की, शनिवारी नखं कापल्याने शनी नाराज होतो. यामुळे शारीरिक-मानसिक, आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर, रविवारच्या दिवशी नखं कापल्याने कुंडलीतील सूर्य ग्रह कमजोर होतो. यामुळे आत्मविश्वास कमी होतो. प्रगतीसाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. मंगळवारच्या दिवशी देखील नखं कापणं शुभ मानलं जात नाही. तर, गुरुवारच्या दिवशी चुकूनही नखं कापू नका. या दिवशी शुभ ग्रहदेखील अशुभ फळ देतात असं म्हणतात. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी नखं कापू नका. यामुळे वैवाहिक जीवनात समस्यांचा सामना करावा लागतो.
'या' दिवशी नखं कापणं शुभ
शास्त्रानुसार, नखं कापण्यासाठी बुधवार आणि शुक्रवारचा दिवस शुभ मानला जातो. बुधवारच्या दिवशी नखं कापल्याने धन-संपत्तीत वाढ होते, नोकरी-व्यवसायात यश येतं.तर, शुक्रवारच्या दिवशी नखं कापल्याने सौंदर्य आणि आकर्षणात वाढ होते. देवी लक्ष्मीची कृपा राहते. तसेच, नकारात्मक विचार दूर होतात.
नखं कापण्याची योग्य वेळ कोणती?
जर तुम्हाला नखं कापायची असतील तर त्यासाठी चुकूनही सूर्यास्ताची वेळ निवडू नका. संध्याकाळी किंवा रात्री नखं कापल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. नखं कापण्यासाठी योग्य वेळ सूर्योदयाची आहे. सूर्यास्ताच्या दीड तास आधी कापावीत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :