Astrology : ज्योतिष शास्त्रामध्ये शनि हा एक महत्वाचा ग्रह मानला जातो, जो न्याय आणि कठोर परिश्रमाची देवता देखील आहे. शनिबद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा तो एखाद्या राशीसाठी अशुभ असतो तेव्हा तो जीवनात अनेक अडचणी निर्माण करतो. शनि अशुभ असेल तर त्या व्यक्तीला प्रेमातही यश मिळत नाही. तुमच्याही राशीमध्ये शनि अशुभ असेल तर हे उपाय नक्की करा


शनीचे अशुभ संकेत
ज्योतिषशास्त्रात शनीला मकर, कुंभ राशीचा स्वामी असे वर्णन केले आहे. मात्र मेष राशीमध्ये तो दुर्बल होतो, तर शनि जेव्हा तूळ राशीत येतो तेव्हा तो फळदायी होतो. तुळ शनीची आवडती राशी आहे. जेव्हा शनि अशुभ असतो तेव्हा देतो या समस्या-


-गंभीर रोग
-आर्थिक हानी
-जमा केलेले भांडवल नष्ट होऊ लागते
-जवळच्या लोकांशी संबंध बिघडू लागतात
-शत्रूंच्या संख्येत वाढ
-अचानक आरोग्याची हानी
-वैवाहिक जीवनात मतभेद आणि तणाव
-प्रेम संबंधांमध्ये व्यत्यय येतो
-लग्नाला उशीर होतो
-लग्न तुटते
-न्यायालयीन प्रकरणात वाढ होते


शनिची दृष्टी
शनीला प्रसन्न ठेवणे फार महत्वाचे आहे. जर शनि वेळेवर प्रसन्न झाले नाही, तर जीवनात अडचणी वाढू लागतात. कुंडलीतील 5 वे घर प्रेम संबंधांबद्दल सांगितले गेले आहे. कुंडलीच्या या घरावर जेव्हा शनिदेवाची दृष्टी पडते तेव्हा प्रेमसंबंधांमध्ये समस्या निर्माण होतात.


शनीला प्रसन्न ठेवण्यासाठी उपाय
ज्योतिषशास्त्रात, शनीला प्रसन्न ठेवण्यासाठी काही  उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांचे पालन केल्यास शनिदेवाचे अशुभ दूर होऊ शकतात


शनिवारी शनिदेवाची पूजा करा
शनि मंदिरात मोहरीचे तेल अर्पण करा.
शनि मंत्र आणि शनि चालिसाचे पठण करा.
आर्थिक दुर्बल लोकांना मदत करा.
जे कष्ट करतात त्यांना मदत करा.
कोणावरही टीका करू नका.
इतरांना कधीही इजा करू नका.
धार्मिक कार्यात रस घ्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :