Diwali 2022 : 1995 नंतर आता 2022 मध्ये दिवाळीला (Diwali 2022) सूर्यग्रहण ( Solar Eclipse )होणार आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांशिवाय इतर अनेक देशांमध्येही हे सूर्यग्रहण दिसणार आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम लक्ष्मीपूजन ते दीपोत्सव या दिवसांवर होणार आहे. हा दीपोत्सव यावेळी 5 ऐवजी 6 दिवसांचा असेल. यावेळी दिवाळीत पडणाऱ्या सूर्यग्रहणाचा काय परिणाम होईल? जाणून घ्या



6 दिवसांचा दीपोत्सव 
ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी दीपोत्सव 5 ऐवजी 6 दिवसांचा असेल. कारण दिवाळी ते गोवर्धन पूजा दरम्यान सूर्यग्रहण आहे. अशातच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कोणत्याही प्रकारची पूजा करण्यास मनाई करण्यात आली आहे. सूर्यग्रहणाचे सुतक 12 तास अगोदर सुरू होणार आहे. यानुसार सूर्यग्रहणाच्या सुतकपासून मोक्षकाळापर्यंत कोणत्याही प्रकारची पूजा किंवा इतर धार्मिक कार्य करण्यास मनाई असेल. त्यामुळेच यंदा दीपोत्सवाची वेळ आणखी एक दिवसाने वाढून 5 ऐवजी 6 दिवसांवर आली आहे. मात्र, सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत.


लक्ष्मीपूजनाच्या रात्रीपासून सूर्यग्रहण
ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळी 24 ऑक्टोबरला आहे. मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:22 पासून सूर्यग्रहण सुरू होईल. कारण सुतक काल 12 तास आधी लागतो, म्हणूनच दिवाळीत लक्ष्मीपूजनानंतर, त्याच्या उशिरा रात्री सुतक काल होईल. मंगळवारी दुपारी 4.22 पासून सुरू होणारे सूर्यग्रहण मंगळवारी संध्याकाळी 6.25 पर्यंत राहील. सूर्यग्रहणाचा प्रभाव सुतक काळापासून सुरू होतो आणि सूर्यग्रहण संपेपर्यंत म्हणजेच मोक्षकाळापर्यंत असतो. या काळात धार्मिक कार्यासह इतर सर्व शुभ कार्ये निषिद्ध मानली जातात.



25 रोजी धार्मिक कार्य करण्यास मनाई
25 तारखेला होणारे सूर्यग्रहण असल्याने या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमास बंदी असेल. तर 26 ऑक्टोबर रोजी गोवर्धन पर्व साजरे केले जाणार आहे. दुसऱ्या दिवशी भाऊबीजचा सण असेल.


27 वर्षांनंतर ग्रहणाची छाया
ज्योतिषशास्त्रानुसार, देशातील जवळपास सर्व राज्यांव्यतिरिक्त हे सूर्यग्रहण आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये तसेच युरोपच्या बहुतांश भागात पाहता येईल. याआधीही 1995 मध्ये म्हणजेच 27 वर्षांपूर्वी दिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण आले होते. त्याकाळी सुतक काळापासून मोक्षकाळापर्यंतचा काळ सर्व कामे बंद करून लोकांनी तो दिवस घरीच घालवला होता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्वाच्या बातम्या